Thursday, July 4, 2024
Homeक्राईमशेतकऱ्यासह नाेकरदार शेअरचे बळी; चाैघांना आमिष दाखवून टेलिग्रामवरुन 'इतक्या' लाख रुपयांचा गंडा

शेतकऱ्यासह नाेकरदार शेअरचे बळी; चाैघांना आमिष दाखवून टेलिग्रामवरुन ‘इतक्या’ लाख रुपयांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शेअर ट्रेडिंगचा हव्यास अनेकांना नडत असून नागरिकांकडील आयुष्याची जमापुंजी या सायबर गुन्ह्यातून उकळली जात आहे. आता शहरात पुन्हा एका शेतकऱ्यासह (Farmer) इतर तिघा नाेकरदारांना आर्थिक गुंतवणूक (Invesment) केल्यास जास्तीचा परतावा देण्याते अमिष दाखवून तब्बल ९५ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समाेर आले आहे. त्यानुसार शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार अनाेळखी टेलिग्राम अकाउंट धारकांवर फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सायबर पाेलीस ठाण्यात (Satpur Police Station) शहरातील एका शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यासह इतर तिघा व्यावसायिक आणि नाेकरदारांना जुलै २०२३ ते मे २०२४ दरम्यान, व्हाट्सॲप आणि टेलिग्राम आयडीवरुन संशयित सायबर संशयित आणि टेलिग्राम अकाउंट धारकांनी संपर्क केला. यानंतर त्यांना टेलिग्रामसह त्यातील चॅनलला ॲड करुन घेत शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेडिंग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बँकेत ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा

त्यानंतर शेतकऱ्यासह इतरांनी संशयितांच्या अमिषास बळी पडून पैसे गुंतवण्यास होकार दिला. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून व्हाट्सॲपवर ज्वाॅईन करण्यास सांगितले. ग्रुप जॉइन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक ॲप डाऊनलोड करायला सांगितले. शेतकरी व इतरांनी ॲप्लिकेशन डाऊनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांना काही प्रमाणात मोबदला देण्यात आला. ताे बँक खात्यात दिसत हाेता, तर माेठी रक्कम ॲपवर आभासी स्वरुपात दिसत हाेती. त्यामुळे चाैघांनाही शेअर ट्रेडिंगमधून फायदा होत आहे असा विश्वास बसल्याने त्यांनी पैश्यांची अधिक गुंतवणूक सुरु ठेवली.

चाैघांनीही वरील कालावधीत एकूण ९४ लाख ८६ हजार रुपये विविध बँक खात्यांत वर्ग केले. काही काळानंतर मात्र, त्यांना ते पैसे काढण्यास अडचणी आल्या. त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुन्हा जादा पैशांचे अमिष दाखविले. वेळोवेळी आणखी पैसे भरावयास सांगितले. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री झाल्यावर शेतकऱ्यासह इतरांनी शहर सायबर पोलिस ठाण्यात (Cyber Police Station) धाव घेतली. त्यानुसार शेतकरी व तक्रारदारांचे पैसे विविध बँक खात्यांतून साखळी पद्धतीने वेगळेगळ्या बँक खात्यातून पुढे वर्ग करण्यात आल्याचे समाेर आले.

हे देखील वाचा : T20 World Cup 2024 : रोहित शर्मा-विराट कोहलीचा टी-२० क्रिकेटला अलविदा

आर्थिक गुंतवणूक करताना जाेखीम पडताळून पहावी. माहितगाराकडून माहिती घेतल्यावरच पुढील पावले उचलावीत. अनाेळखी चॅनेलला ॲड हाेऊ नये व काेणत्याही आकर्षक व संशयास्पद लिंकला क्लिक करु नये. शक्यताे अधिकृत ठिकाणी जाऊनच गुंतवणूकीचे पर्याय निवडावे. फसवणूक टाळण्यासाठी सायबर पाेलिसांशी संपर्क करावा. 

रियाज शेख, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक, सायबर, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या