Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशकट उधळला! चार दहशतवाद्यांना अटक, मोठा दारुगोळा जप्त

कट उधळला! चार दहशतवाद्यांना अटक, मोठा दारुगोळा जप्त

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीत (Delhi) बॉम्बस्फोट (Bomb Blast) घडवण्याचा कट उधळून लावण्यात करनाल पोलिसांना (Karnal Police) यश आले आहे. हरियाणामधील (Haryana) करनाल जिल्ह्यातून ४ दहशतवाद्यांना (Terrorist) पोलिसांनी ताब्यात (Arrested) घेतल्याचे समजते…

- Advertisement -

या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला असून ते दहशतवादी महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) येथे जात होते. दिल्लीत मोठा कट घडवून आणणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या दहशतवाद्यांकडून बंदुकीच्या गोळ्या आणि गनपावडरचे कंटेनर पोलिसांनी जप्त केले आहेत. ही गनपावडर आरडीएक्स असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे चौघे दहशतवादी पंजाबस्थित संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. हे दहशतवादी सुमारे २० ते २५ वर्षांचे असून ते चौघे हरविंदर सिंग उर्फ रिंडा याच्याशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रिंडा हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून तो सध्या पाकिस्तानमध्ये लपला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या