Friday, April 25, 2025
HomeनाशिकAccident : मोहदरी घाटात चार वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

Accident : मोहदरी घाटात चार वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

आज संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर येथील मोहदरी घाटातील वळणावर चार वाहनांचा अपघात झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान मोहदरी घाटातील वळणावर आयशर टेम्पो क्रमांक MH 09 CU 6781 ने पुढे चालणाऱ्या बलेनो कार क्रमांक MH03 CS 2359 ला धडक दिली व आयशर टेम्पो खोल दरीत कोसळला तर त्या पाठोपाठ दुधाचा टँकर क्रमांक MH 17 BD 6999 ने टोइंग गाडी नंबर क्रमांक MH 15 GV 4174 ला धक्का देत दुधाचा टँकर पलटी झाला. टँकर मधील दूध वाहून गेल्याचे वृत्त आहे.

सदर अपघातात चारही वाहनांचे चालक अत्यंत किरकोळ जखमी झालेले आहेत. रात्र असल्यामुळे खाली दरीत गेलेला आयशर टेम्पो हे काढणे शक्य नसून बलेनो कार व दूध टँकर यास सरळ करून रोडचे कडेला सुव्यवस्थेत केले असून टँकर उचलण्याचे काम सुरु आहे. नासिक कडून ते सिन्नर बाजूकडे चालणारी वाहतूक ही धिम्या गतीने सुरु असल्याचे समजते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...