नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील (Panchvati) बस आगाराजवळ पीडितेचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी दोघा आरोपींना नाशिक न्यायालयाने (Nashik Court) चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी साडेबारा हजार असे २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच, दंडाच्या रकमेतील २४ हजार रुपये पीडितेला देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : म्हसरूळला रिक्षाचालकाची हत्या
याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र शार्दूल भयानी (३१, रा. विनायक अपार्टमेंट, पंचवटी), महेश प्रकाश कैचे (३५, रा. पंचवटी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, २३ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास त्या पंचवटी बस आगाराकडून (Panchvati Bus Stand)आडगाव नाक्याकडे पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोघे आरोपी आले. आरोपी रवींद्र याने पीडितेचा हात पकडून विनयभंग केला तर आरोपी महेश याने, नाही आलीस तर घेऊन जाईल असा दम दिला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे देखील वाचा : इंडिगोची नाशिक-बंगळुरू विमानसेवा ‘या’ तारखेपासून होणार सुरु
दरम्यान,गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक उपनिरीक्षक ए. एम. सरोदे यांनी केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्यासमोर खटला चालून सरकार पक्षातर्फे सहायक अभियोक्ता सुनिता चितळकर यांनी कामकाज पाहिले. यात दोन्ही आरोपींविरोधातील आरोप सिद्ध झाल्याने न्या. पाटील यांनी दोघा आरोपींना (Accused)चार वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १२ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दंडाच्या २५ हजारांपैकी २४ हजार रुपये पीडितेला देण्याचेही आदेश दिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम.ए. खंबाईत, महिला अंमलदार पी. पी. गोसावी, अंमलदार विक्रांत नागरे यांनी पाठपुरावा केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा