Saturday, April 26, 2025
Homeनाशिकपाण्याच्या टाकीत बुडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू

पाण्याच्या टाकीत बुडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

खेळताखेळता बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना (दि. २७) सायंकाळी चांदगिरी येथे घडली. रागिनी महेंद्रकुमार वर्मा(वय: चार वर्ष पाच महिने, रा. माेगल मंजिल, रेल्वे ट्रॅक्शनजवळ, बालाजीनगर, एकलहरा राेड) असे मृत बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकराेड पाेलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

रागिनीचे वडील महेंद्रकुमार व तिची आई माेलमजुरी करतात. ते शनिवारी सकाळी ठेकेदारामार्फत चांदगिरी येथील मारुती मंदिरासमाेर नव्याने सुरु असलेल्या बंगल्याचे बांधकाम करण्यासाठी आले हाेते. सायंकाळी पाच वाजता वर्मा कुटुंब मजुरी करत असतांना या बंगल्याच्या जवळ बांधकामाला पाणी मारण्यासाठी बांधलेल्या पाण्याची टाकीत रागिनी खेळतांना पडली. ती पूर्णत: बुडाल्याने नाकाताेंडात पाणी जाऊन गतप्राण झाली.

तिचे आई वडील कामाच्या गडबडीत असताना रागिनी नजरेसमाेर येत नसल्याने त्यांनी आरडाओरड करुन शाेध घेत असताना पाण्याच्या टाकीत पाहिले असता, ती निपचित पडल्याचे दिसून आले. तत्काळ पाण्यातून बाहेर काढून तिला बिटकाे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घाेषित केले. तपास हवालदार संताेष पाटील करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...