Monday, May 6, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये दिसला कोल्हा, मात्र प्रत्यक्षात निघाला...!

औरंगाबादमध्ये दिसला कोल्हा, मात्र प्रत्यक्षात निघाला…!

औरंगाबाद – aurangaad

(CIDCO) सिडकोतील एन-१ परिसरात भल्या पहाटे (Fox) कोल्हा आल्याच्या अफवेने खळबळ उडाली. संध्याकाळ होता-होता तो लांडगा असल्याच्या निष्कर्षावर रहिवाशी पोहचले. प्रत्यक्षात तो कोल्हा किंवा लांडगा नसून कुत्रा (Dog) असल्याची शक्यता वन खात्याने वर्तवल्यावर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

- Advertisement -

एन-१ येथील (Shamaprasad Mukherjee Park) शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या विद्या अंभुरे, अश्विनी पाटील या महिलांना पहाटे साडेपाचच्या सुमारास कोल्ह्यासारखा प्राणी जातांना दिसला. त्यांनी (Mobile) मोबाईलमध्ये या प्राण्याचे छायाचित्र टिपले. पहाटेचा अंधार आणि तो प्राणी वेगाने पळून गेल्याने छायाचित्र अस्पष्ट आले. मात्र, त्याच्या एकूणच दिसण्यावरून तो कोल्हा असल्याची चर्चा रंगली. दिवसभर विविध (WhatsApp) व्हॉटसॅप ग्रुपवर ही छायाचित्रे फिरली. संध्याकाळ होता-होता तो कोल्हा नसून लांडगा असल्याची चर्चा रंगली.

या प्रकाराची माहिती मिळताच वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात धाव घेऊन कस्ून शोध घेतला. तसेच फोटोही जवळून तपासले. मात्र, येथे कोल्हा किंवा लांडगा आल्याची चिन्हे आढळली नाहीत. त्याच्या पायाचे ठसेही दिसले नाहीत. यावरून तो कोल्हा नसून कुत्रा असल्याचीच शक्यता वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांनी वर्तवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या