Monday, May 6, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारात साडे सहा लाखांचा सुगंधीत गुटखा जप्त

नंदुरबारात साडे सहा लाखांचा सुगंधीत गुटखा जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

शहरातील पटेलवाडी परिसरात एका घरात (maharastra) महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला ६ लाख ४२ हजार रुपये किमतीचा सुगंधीत तंबाखूचा साठा आढळून आला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात बंदी असलेला (Gutkha) गुटखा व सुगंधीत तंबाखुची होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी गुन्हे परिषदेच्या वेळेस जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखु याबाबत माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पोलीस अधीक्षक श्री.पाटील यांना दि.६ जून २०२२ रोजी नंदुरबार शहरात पटेलवाडी भागात एका इसमाने अवैधरीत्या महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधीत तंबाखुचा मोठ्या प्रमाणात साठा केला असून तो त्याची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शानाखाली तात्काळ एक पथक तयार करुन पटेलवाडी येथे सापळा रचला. तेथील घरामध्ये एक इसम होता पोलीसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला पोलीसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

अब्दुल हमीद शेख वय-४३ रा.पटेलवाडी, नंदुरबार असे त्याचे नाव आहे. सदर इसमाच्या घराची पाहणी केली असता एका कोपर्‍यात झाकून ठेवलेल्या पांढर्‍या व पिवळ्या रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्या आढळून आल्या.

त्या गोण्यांमधुन उग्र वास येत होता. सदर गोण्यांमध्ये विविध कंपनीच्या सुगंधीत तंबाखुची ६ लाख ४२ हजार ३०० रुपये किमतीची ९ हजार ३२७ पाकीटे आढळून आली. याप्रकरणी अब्दुल हमीद व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याविरुद्ध भा.द.वि. कलम ३२८, १८८, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, पोलीस शिपाई अभिमन्यु गावीत, दिपक न्हावी, अभय राजपूत यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या