Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाेकरदारास २ काेटींना ठगविले

नाेकरदारास २ काेटींना ठगविले

नाशिक। प्रतिनिधी

- Advertisement -

शेअर मार्केटमध्ये १२ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास ५ कोटी रुपयांचा परतावा देण्याचे आमीष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील एका नाेकरदारास २ कोटी १३ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे पैशाच्या माेहासाठी या नाेकरदाराने कर्ज काढून शेअर्ससाठी पैसे गुंतविले आहेत. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या नोकरदार व्यक्तीने डिमॅट खाते सुरु केले होते. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकीचा अनुभव नसल्याने त्यांनी माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यावेळी भामट्याने त्यांना फोन करून गुंतवणूकीचा सल्ला देत चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवले. त्यामुळे गुंतवणूकदाराने टप्प्याटप्प्याने दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली.तसेच नंतर त्यावर भरोसा ठेवून गुंतवणूकदाराने त्यांना ६३ लाख रुपये दिले. मात्र परत गुंतवणूकदारास गंडा घातला. पैसे परत मागितल्यानंतर संशयितांनी ते देण्यास टाळाटाळ केली.त्यामुळे गुंतवणूकदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या