Monday, June 15, 2026
Homeक्राईमNashik News: ई सेवा केंद्रचालकास तब्बल 'इतक्या' कोटींना घातला गंडा

Nashik News: ई सेवा केंद्रचालकास तब्बल ‘इतक्या’ कोटींना घातला गंडा

नाशिक। प्रतिनिधी
आधार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मदतीच्या बहाण्याने शहरातील एका संशयिताने ओळख झालेल्या ठाणे येथील ई सेवा केंद्र चालकाच्या ‘करंट अकांऊट’मधून तब्बल ३ कोटी ४१ लाख २६ हजार ५७६ रुपयांचे व्यवहार करुन ८७ लाख ८९ हजार ४१५ रुपयांचा ओव्हरड्राफ्ट व्यवहार करुन गंडा घातला. केंद्र चालकास सात लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे भामट्याने मदतीच्या बहाण्याने सुमारे सव्वा चार कोटींचा गंडा घातला आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील स्वप्निल बनसोडे (३४) यांचे ई सेवा केंद्र आहे. त्यांना आधार सेवा केंद्र सुरु करायचे होते. त्यासाठी नातलगांच्या ओळखीच्या माध्यमातून त्यांची संशयित अनिल पवार याच्याशी ओळख झाली. नांदुरनाका येथील हॉटेल प्रेस्टीज येथे २ जुलैला दोघे भेटले. स्वप्निल यांना आधार केंद्र सुरु करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे लक्षात आल्याने संशयित अनिल याने ७ लाख रुपयांची मदत करण्याचे आमीष दाखवले.

- Advertisement -

मात्र त्यासाठी स्वप्निल यांच्या बँक खात्यातील करंट अकांऊटचा ताबा अनिलने मागितला. त्यानुसार स्वप्निलने बँक खात्याची माहिती व पासवर्ड आणि बँक खात्यात लिंक असलेले सीमकार्ड संशयितास दिला. त्यानंतर २ ते ३ जुलै दरम्यान, संशयिताने बँक खात्यातून पैसे काढून दुरुपयोग केला. तसेच ओव्हर ड्राफ्ट(खाते वजा व तोट्यात) करुन पैसे वापरून स्वप्निल यांची आर्थिक फसवणूक केली. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रविण चव्हाण यांच्या सूचनेने सहायक निरीक्षक निखिल बोंडे करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...