Thursday, October 1, 2026
HomeनाशिकNashik News : नाशिकमध्ये पुन्हा रस्ते खोदणार; मिळाली 'इतक्या' दिवसांची परवानगी

Nashik News : नाशिकमध्ये पुन्हा रस्ते खोदणार; मिळाली ‘इतक्या’ दिवसांची परवानगी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थाच्या (Simhstha) कामांसह विविध विकासकामांसाठी झालेली खोदकामे आणि खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची (Roads) झालेली वाताहत लक्षात घेता पावसाळ्यापर्यंत थांबविण्यात आलेली रस्ते खोदकामे आता पुन्हा सुरू होणार आहेत. नाशिक महानगरपालिकेने एमएनजीएल, ऑप्टिकल फायबर, बीएसएनएल, महावितरण आणि स्मार्ट सिटी कंपनीला शहरातील रस्ते खोदण्यासाठी १५ दिवसांची परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील (City) विविध भागांत पुन्हा रस्ते खोदले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होऊ नये तसेच गणेशोत्सवाच्या (Ganeshtosav) पार्श्वभूमीवर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने काही काळ रस्ते खोदकामांना मर्यादा घातल्या होत्या. आता पावसाळा संपल्यानंतर विविध यंत्रणांकडून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी संबंधित ठेकेदार कंपन्यांनी शिल्लक खोदकामे निर्धारित मुदतीत पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्याचे निर्देश आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

खोदकाम करताना सुरक्षात्मक उपाययोजना करणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता तातडीने पूर्ववत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रस्त्यांवर सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना आधीच वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात पुन्हा खोदकामे सुरू होणार असल्याने संबंधित यंत्रणांनी कामे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर (NMC) राहणार आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : महागाई, मतदार याद्यांतील घोळ आणि दुष्काळावरून रोहित पवारांचा सरकारवर...

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon वाढती महागाई, मतदार याद्यांतील कथित घोळ, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घडामोडींवरून आ. रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली....