Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAaditya Thackeray : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी; आदित्य...

Aaditya Thackeray : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी; आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असून प्रदीप पुर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या झाल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली. ठाण्यातील मानपाड्यात शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली. या घटनेवर आदित्य ठाकरे यांनी आज एक्स या समाज माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

पूर्णेकर यांच्या हत्येची (Murder) घटना अतिशय चीड आणणारी आणि घृणास्पद आहे. या राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या झालेल्या आहेत, हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले. सामान्य माणसाचे सुरक्षित जगणे कठीण होत चालले आहे. पोलीस त्यांचे काम करण्याचा प्रयत्न करतील, पण राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळणारे वातावरण तयार होत असेल तर पोलीस विभाग तरी काय करणार, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. या हत्येतील गुन्हेगारांना आणि त्यामागील शक्तीला ताबडतोब अटक होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : संजय राऊत

ठाणे हे गेल्या काही काळापासून गुन्हेगारांचा अड्डा आणि आश्रयस्थान बनले आहे. या राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केली. पूर्णेकरांना ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांचे सूत्रधार शिंदे यांच्या शिवसेनेतील आहेत, असा दावाही त्यांनी केली. या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे, त्यांचे कुटुंब आणि त्यांनी पोसलेली गुंडांची टोळी जबाबदार आहे. ठाण्यात हत्यांची मालिका सुरू असताना गृहखाते, ठाण्याचे पोलीस आयुक्त काय करत आहेत? पोलीस आयुक्त मंत्र्यांचे घरगडी आहेत का? ठाण्यात गृह खात्याची रेंज पोहोचत नाही का? असे सवालही राऊत यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर ठाणे येत नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. लज्जास्पद गृहमंत्री म्हणून इतिहासात त्यांची नोंद राहील, असा टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 350 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 3653 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...