Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedदामदुप्पटीचे आमिष ; ५० लाखांचा गंडा

दामदुप्पटीचे आमिष ; ५० लाखांचा गंडा

औरंगाबाद – aurangabad

विदेशी चलन (currency) आणि कोटींचा कर भरल्याच्या पावत्या दाखवून विश्वासात घेत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून सात जणांची ५० लाखांची (fraud) फसवणूक झाली. प्रवीण दादाराव शेकोकर (रा. कुंभेश्वर पार्क, कुंभेफळ) असे आरोपीचे नाव आहे. गुंतवणूकदारांनी तगादा लावल्यानंतर त्याने बंद बँकेचे धनादेश देत पोबारा केला. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मुकुंदवाडी (police) पोलिसांत धाव घेतली.

- Advertisement -

शेंद्रा येथील हरमन फिनोकेम कंपनीतील सीनियर एक्झिक्युटिव्ह अभिजित अनिल गोजरेकर (४१) यांची सहकारी प्रदीप निकममार्फत ऑक्टोबर २०१९ मध्ये शेकोकरसोबत ओळख झाली होती. शेकोकरची ग्लोबल सेल्स सर्व्हिसेसची एक्स्पोर्ट कंपनी असून त्यात पैसे गुंतवल्यानंतर चांगला परतावा मिळत असल्याचे निकमने सांगितले. भवानी पेट्रोलपंपाच्या मागील इमारतीमधील कार्यालयात गोजरेकर यांनी शेकोकरची भेट घेतली. शेकोकरने त्याची कंपनी विदेशात फळे, मसाले, साखर व अन्य पदार्थ निर्यात करते. त्याने कंपनीचे एक्स्पोर्ट लायसन्स, दिनार चलनात आलेली रक्कम व कोटी रुपये भरलेल्या कराच्या पावत्या दाखवल्या. त्याने थ्री अॅपल फूड सोल्युशन आणि पी. एस. फ्रूट कंपनी फर्म असल्याचे सांगितले. ११ नोव्हेंबर २०१९ रोजी गोजरेकर यांनी पहिल्यांदा शेकोकरला २ हजार रुपये पाठवले. त्या बदल्यात आरोपीने ३ हजार ६०० रुपये परतावा दिला. अशा प्रकारे त्यांनी ११ लाख ६७ हजार रुपये गुंतवले.

गोजरेकरप्रमाणे त्यांची पत्नी प्रियंका यांनी दोन वेळा साडेतीन लाख, अनिल रामचंद्र गोजरेकर यांनी ३ लाख दोन हजार रुपये, जयश्री ब्रह्मे यांनी १ लाख ५२ हजार रुपये, बहीण स्वप्नाली चंद्रात्रे यांनी २६ लाख ८७ हजार रुपये, मित्र शशिकांत बेंडाळे यांनी १ लाख २ हजार रुपये, अशोक पाटील यांनी १ लाख ५२ हजार रुपये असे एकूण ४९ लाख १२ हजारांची शेकोकरकडे गुंतवणूक केली. काही दिवस परतावा दिल्यानंतर गुंतवणूकदारांचे कॉल रिसीव्ह करणे बंद केले. फसवणूक झाल्याचे समजल्यावर गुंतवणूकदारांनी तक्रार दिली.

अशी सांगितली स्कीम

यात गुंतवणूकदारांनी १ लाख २ हजार रुपये गुंतवले, तर त्यांना ५ टक्के टीडिएस, ५ टक्के अॅडमिन चार्जेस कपात करून आठवड्याला ४० आठवड्यापर्यंत ३ हजार ६०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. व्यवसाय साखळी पद्धतीचा असून माझ्याकडे पैसे गुंतवल्यास तुम्हाला परतावा देईन. तसेच माझ्या व्यवसायात आणखी लोकांनी गुंतवणूक केल्यास १० टक्के कमिशन देण्यात येईल. त्यात २० लाखांची गुंतवणूक केल्यास महिना रॉयल्टी म्हणून आयुष्यभर २० हजार महिना देणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या