Sunday, October 6, 2024
HomeनाशिकNashik Crime News : ओळखीचा फायदा घेत तीन काेटींचा गंडा; पाच गुन्हे...

Nashik Crime News : ओळखीचा फायदा घेत तीन काेटींचा गंडा; पाच गुन्हे नाेंद

शिपायाने ‘फी’ चे पैसे लाटले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ओळखीचा गैरफायदा घेत नागरिकांना लुटणाऱ्यांनीही आता हद्दपार केल्याचे समाेर आले असून म्हसरुळ, इंदिरानगर, गंगापूर पोलिसांत (Gangapur Police) एकाच दिवशी फसवणुकीचे (Fraud) चार गुन्हे नोंद झाले आहेत. यात तब्बल ३ कोटी पाच लाख ९४ हजार रुपये उकळून नागरिकांना गंडा घालण्यात आला आहे. परस्पर भागीदारी, शालेय फी, प्लॉटच्या व्यवहारांसह नोकरीच्या आमीषातून हे प्रकार घडले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिकमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अ‍ॅण्ड रन

याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वेसह (Railway) इतर शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवित चौघांनी नाशिकच्या चाैघा बेराेजगार तरुणांना १८ लाख ८२ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी भूषण विलास खंबाईत (३०, रा. मुपाे. निरगुडे, ता. पेठ) यांनी म्हसरुळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित कैलास उत्तम चव्हाण (रा. बोरगड), श्रीकांत बापू आहिरे(रा. ठेंगाेडा, ता. सटाणा), सोमनाथ कृष्णा पवार (रा. लाेणारे, ता. सटाणा) व वसंत रमेश खांडवी (रा. मेघराज बेकरीमागे, पेठरोड) यांच्याविरुद्ध गुन्हा (Case) नोंद आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ड्रग्ज तस्करीचा बाेगस धाक दाखवून इंजिनिअरला ३५ लाखांचा गंडा

सन २०१८ ते २०२१ या कालावधीत संशयित खांडवी यांच्या घरात हा प्रकार घडला. संशयितांनी तरुणांना (Youth) बवनाट नियुक्ती पत्र दिल्याचेही समोर आले आहे. तर, दुसऱ्या गुन्ह्यात इथेनॉल कंपनी खरेदी करण्यासाठी भागीदार शाेधत त्यासाठीची गुंतवणूक, त्यावरील व्याजाचा अपहार झाल्याचा प्रकार घडला. २ कोटी ११ लाख वीस हजार रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी रेवती अश्विन मोरे (वय ३९, रा. म्हसरुळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार म्हसरुळ पोलिसांत संशयित मुकेश राठोड, त्यांची पत्नी, सौरभ राठोड, प्रणव राठोड, राहुल पवार, सी ए रॉबीन, गिरीश शेट्टी, हायड्रोस कुट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. माेरे यांनी कंपनीत भागीदारी केल्यानंतर संशयितांनी ते रद्द करण्यास सांगून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यात बँक अधिकाऱ्यांचा सहभाग उघड हाेताे आहे.

हे देखील वाचा : जि.प. सुपर ५० उपक्रम : जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

तसेच घर खरेदीचे आश्वासन देत दाम्पत्याने एकाकडून ३१ लाख ८४ हजार रुपये घेत स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्या प्रकार घडला. मिलिंद आनंद बच्छाव (वय ५४, रा. पखालरोड) यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित संजय सोमनाथ निमगुळकर व तनुजा संजय निमगुळकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. दोन्ही संशयितांनी सन २०१७ ते २०२४ या कालावधीत बच्छाव यांच्याकडून पैसे घेत घर खरेदी करुन न देता बच्छाव यांच्या वडीलांना धमकाविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

हे देखील वाचा : लक्झरी बस दरीत कोसळली; दोन जणांचा मृत्यू

साेबतच, कोणार्क नगरातील डॉ. अमोल सुदाम महाजन (वय ४६) यांनी इंदिरानगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित किरण वसंतराव राजवाडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. संशयिताने महाजन यांना फ्लॉट विक्री करुन देण्याचे सांगत सदर प्लॉटचे बनावट कागदपत्रे तयार करुन त्यात फेरफार केला. प्लॉटची विक्री करण्याऐवजी संशयिताने स्वत:च्या नावावर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसांत नोंद झालेल्या गुन्ह्यांनुसार तपास सुरु आहे. मात्र, वाढत्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांनी आर्थिक व्यवहारांत सजग राहण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केली आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : ८ जुलै २०२४ – कर्तव्येही महत्वाची!

शिपायाने केला अपहार

गंगापूर राेडवरील भोसला मिलिटरी स्कूलच्या लेखा विभागातील शिपायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पालकांकडून थेट स्वत:च्या बँक खात्याचा क्यूआर काेडद्वारे जमा करवून घेतल्याचा प्रकार उघड झाला. याबाबत संदीप पुरी (रा. कमांडंट रेसीडेन्सी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार विलास भास्कर आहेर या संशयित शिपायाविरुद्ध ४४ लाख आठ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा गंगापूर पोलिसांनी नोंदविला आहे. संशयिताने स्वत:च्या बँक खात्याचा क्रमांक विद्यार्थी व पालकांना देत त्यात क्यूआर काेड स्वत:चा दिला. शैक्षणिक शुल्क जमा करवून घेतले. सन २०२३ मध्ये हा प्रकार घडला असून सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार पुढील तपास करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या