Friday, September 20, 2024
HomeनाशिकNashik Crime News : ड्रग्ज तस्करीचा बाेगस धाक दाखवून इंजिनिअरला ३५ लाखांचा...

Nashik Crime News : ड्रग्ज तस्करीचा बाेगस धाक दाखवून इंजिनिअरला ३५ लाखांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

मनी लाँन्ड्रिंगमध्ये ड्रग्ज तस्करी आणि मनी लाँन्ड्रिगच्या कारवाईत तुमचे आधारकार्ड (Aadhar Card) आढळले आहे. त्यामुळे पुढील पाेलीस कारवाईतून सुटका करुन घेण्यासाठी आम्ही सांगू त्या बँक खात्यात पैसे भरा असे म्हणूण बाेगस सायबर अधिकाऱ्यांनी तिवंधा चाैकातील एका साॅफ्टवेअर इंजिनिअरला (Engineer) तब्ब्ल ३५ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. अशा स्वरुपाचे सायबर गुन्हे (Cyber Crime) अलीकडे वाढले असून यात नागरिकांना नाहक तस्करीच्या गुन्ह्यात गाेवण्याचा धाक दाखवून पैसे उकळले जात आहे. याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पाेलिसांनी केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, भद्रकालीतील (Bhadrakali) तिवंधा चाैकात ३३ वर्षीय साॅफ्टवेअर इंजिनिअर वास्तव्यास आहे. त्याला ५ ते ९ मे या कालावधीत संशयित सायबर भामट्यांनी व्हाट्सॲप, स्काईपी ॲपवरुन अचानक संपर्क केला. संशयितांनी आपल्याकडील व्हाट्सॲप क्रमांक ९४१२०१९०८७ व ९९०३५६४७०० आणि स्काईपी आयडी live:.cid.80c9c15b5d25e524 वरुन संपर्क करतानाच ‘मी कुलदीप सिंग, अंधेरी सायबर क्राईम युनिटमधून बाेलत आहे’, तुमचे आधारकार्ड मनी लाँन्ड्रिंगच्या (Money Londring) व्यवहारात आढळले आहे. आम्ही जे ड्रग्जतस्कर पकडले आहेत, त्यांच्याकडे राेख रक्कम, संशयास्पद कागदपत्रे आणि ड्रग्ज आढळले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Accident News : भरधाव कार पुलाचा कथडा तोडून गोदावरी नदीपात्रात उलटली

सापडलेल्या मुद्देमालांत तुमचे आधारकार्ड आणि त्यामार्फत तस्करी व मनीलाँन्ड्रिंगचे व्यवहार झाल्याचे ठाेस पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला तस्करी व मनीलाँन्ड्रिंगच्या केसमध्ये आम्ही अटक करु असे सांगून कारवाईची भिती दाखविली. त्यामुळे हा साॅफ्टवेअर इंजिनिअर घाबरला. त्याने विलंब न लावता, संशयित जे बाेलतील ते ऐकत गेला. तेव्हा स्काईपी आयडी व इतर साेशस मिडीयामार्फत संशयितांनी इंजिनिअरला तस्करी व मनीलाँन्ड्रिंगच्या कारवाईचे बाेगस कागदपत्रे, शिक्के दाखविले.

तर, या एकूणच कारवाईतून (Action) बाहेर पडण्यासाठी आम्ही सांगू त्या बँक खात्यावर तत्काळ  तुमच्या बँक खात्यांत जमा असलेले पैसे वर्ग करण्यास सांगितले. त्यामुळे भेदरलेल्या इंजिनिअरने तत्काळ ३५ लाख ६४ हजार रुपये संशयितांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले. त्यानंतर संशयितांनी इंजनिअरला संपर्क साधला नाही. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इंजिनिअरने शहर सायबर पाेलीस ठाणे (City Police Station) गाठून तक्रार दिली. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पाेलीस निरीक्षक रियाज शेख करत आहेत. 

हे देखील वाचा : Nashik News : पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटली अन्…

खबरदारी घ्या

घाबरुन न जाता थेट सायबर पाेलिसांशी संपर्क साधावा. काेणतेही पाेलीस दल, युनिट थेट पैसे मागून बँक खात्यात वर्ग करण्यास सांगत नाही. एमएनजीएलचे फाेन, तस्करी, मनी लाँन्ड्रिंग, दहशतवादी कारवायांसाठी सीमकार्ड, आधारकार्ड आढळले आहे, तुम्हाला अटक करु, वाॅरंट पाठविले आहे, अशा स्वरुपाचे काॅल, मेसेज आले तर दुर्लक्ष करा. अन्यथा तत्काळ सायबर पाेलीसांत तक्रार करा. 

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या