Thursday, January 29, 2026
Homeक्राईमCrime News : ट्रान्सफॉर्मर देण्याच्या बहाण्याने 84.58 लाखांची फसवणूक

Crime News : ट्रान्सफॉर्मर देण्याच्या बहाण्याने 84.58 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

क्रॉम्प्टन कंपनीचे डीलर असल्याचे भासवून एका कंपनीची तब्बल 84 लाख 58 हजार 430 रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार येथील नागापूर एमआयडीसीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जे. अँड एस. पॉवर सोल्यूशन कंपनीच्या मालकांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत बजाज पॉवर इक्वीपमेंटस प्रा. लि. कंपनीचे मॅनेजर बाबासाहेब शंकर बनकर (वय 45, रा. हनुमाननगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. प्रसन्ना जी. एम., सुष्टीश्री प्रसन्ना (जेएस पॉवर सोलुशन कंपनीचे मालक) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बनकर हे बजाज पॉवर इक्विपमेंट्स प्रा. लि. कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. मे 2025 पासून संशयित आरोपींनी बनकर यांचा विश्वास संपादन करण्यास सुरूवात केली होती. प्रसन्ना जी. एम. आणि सृष्टीश्री प्रसन्ना यांनी आपण क्रॉम्प्टन कंपनीचे अधिकृत विक्रेते असल्याचे बनकर यांना सांगितले. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर पुरवठा करण्याच्या नावाखाली त्यांनी बनकर यांच्याकडून वेळोवेळी आरटीजीएसव्दारे 84 लाख 58 हजार 430 रूपये स्वीकारले.

YouTube video player

दरम्यान, मोठी रक्कम घेऊनही संशयित आरोपींनी संबंधित कंपनीला ट्रान्सफॉर्मर दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बनकर यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रसन्न जी. एम. आणि सृष्टीश्री प्रसन्ना यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परदेशी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Sangamner : कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 24 गोवंश जनावरांची सुटका

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner तालुक्यातील करूले गावात कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या तब्बल 24 गोवंश जनावरांची संगमनेर तालुका पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईत एक...