Wednesday, September 9, 2026
Homeक्राईमCrime News : ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखांची ऑनलाईन फसवणूक

Crime News : ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखांची ऑनलाईन फसवणूक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सायबर गुन्हेगारांनी स्वतःला मुंबई येथील कुलाबा सायबर कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव रचत कर्जत तालुक्यातील एका 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 15 लाख 95 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडिताने येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी हे सेवानिवृत्त असून सध्या शेती व्यवसाय करतात. 7 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला. कॉल करणार्‍या व्यक्तीने स्वतःला मनिष शिंदे, कुलाबा सायबर ऑफिस, मुंबई येथून बोलत असल्याचे सांगत, फिर्यादीच्या नावावर मुंबईतील कॅनडा बँकेत खाते असून ते मनी लाँडरिंगसाठी वापरण्यात आल्याचा खोटा आरोप केला. तसेच फिर्यादीविरूध्द वॉरंट निघाल्याचे सांगत, तपासात सहकार्य न केल्यास अटक केली जाईल आणि कुटुंबीयांना धोका असल्याची धमकी देण्यात आली.

त्यानंतर व्हिडीओ कॉलव्दारे फिर्यादीला ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’ असल्याचे सांगून कोणाशीही संपर्क न ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर फिर्यादीकडील बँक ऑफ महाराष्ट्र, भांबोरा शाखेतील खात्यातील 11.25 लाख रुपये आणि 4.70 लाख रूपये असे एकूण 15.95 लाख रुपये गुडगाव येथील आयसीआयसीआय बँकेच्या विविध खात्यांवर वर्ग करण्यास भाग पाडले.

ताज्या बातम्या

Nashik News : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; मंत्री विखे पाटलांच्या राजीनाम्याची...

0
सातपूर | प्रतिनिधी | Nashik मराठा समाजाच्या (Maratha Community) प्रलंबित प्रश्नांवरून मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, मराठा आरक्षण...