Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशFuel Price : पेट्रोल-डिझेलसोबतच CNG चेही दर वाढले, जाणून घ्या आजचे दर

Fuel Price : पेट्रोल-डिझेलसोबतच CNG चेही दर वाढले, जाणून घ्या आजचे दर

दिल्ली | Delhi

मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा (Fuel Price Hike) धडाका सुरू आहे. या इंधन दरवाढीने जनतेची होरपळ सुरू झाली आहे. आजही तेल कंपन्यांनी (oil companies) पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol, Diesel Prices) वाढ केली आहे. तसेच आज सीएनजीनेही आपला भाव वाढवला आहे.

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन.. रणबीर-आलिया लवकरच अडकणार लग्नबंधनात, तारीख ठरली?

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये ८० पैशांची वाढ केली आहे. मागील १६ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल १४ वेळा दरवाढ झाली. त्यामुळे या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर १० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच सीएनजीच्या (CNG price hike) किमतीत ७ रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (Petrol, Diesel Prices Hiked Again)

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर १०५.४१ रुपयांवर पोहोचले असून एका लिटरसाठी डिझेलसाठी ९६.६७ रुपये मोजावे लागत आहे. तसेच मुंबईत पेट्रोलचे दर १२०.५१ रुपये लीटरवर पोहोचले असून डिझेलचे दर प्रति लीटर १०४.७७ रुपयांवर पोहोचले आहेत.

Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला ‘प्रार्थना’चा मोहक लूक, पहा फोटो

सीएनजीच्या दरवाढीनंतर मुंबई आणि परिसरात सीएनजीची किंमत ६७ रुपये प्रतीकिलो तर पीएनजीची (PNG) किंमत ४१ रुपये प्रती एससीएम अशी होणार आहे. तर दिल्लीत सीएनजी गॅसच्या दरात २.५० रुपयांनी वाढ केल्यानंतर आता सीएनजीचे दर ६६.६१ रुपये प्रति किलो झाली आहे.

Amruta Khanvilkar : ‘अप्सरा हो तुम, या कोई परी’! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

- Advertisment -

ताज्या बातम्या