Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजलजीवन मिशनअंतर्गत चार गावांना निधी : कोर

जलजीवन मिशनअंतर्गत चार गावांना निधी : कोर

अंबासन । वार्ताहर | Ambasan

काटवन भागातील पाणीप्रश्न (water isue) कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जलजीवन मिशन (jaljeevan misssion) योजनेंतर्गत अंबासन (ambasan), चिराई, खालचे व वरचे टेंभे अशा चार गावांना साडेचार कोटी रूपयांचा निधी (fund) मंजूर करण्यात आल्याची माहिती पं.स. सदस्या शितल कोर (shital kore) व भाजप नेते जिभाऊ कोर (BJP leader Jibhau Kor) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

काटवन खोर्‍यातील गावांमध्ये गेल्या काही वर्षात भुजल पातळी (Groundwater level) कमालीची घटली आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा (Water scarcity) सामना करावा लागतो. सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी आटल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काही गावांमध्ये तर एैन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

याबाबत अंबासन येथील पं.स. सदस्या शितल कोर यांनी खा.डॉ. सुभाष भामरे (mp subhash bhamre), आ. दिलीप बोरसे (mla dilip borse) यांच्याकडे गार्‍हाणे मांडल्यानंतर केंद्र सरकारच्या (central government) जलजीवन मिशन योजनेंतर्गत चार गावांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यानुसार चिराईसाठी 1 कोटी 46 लाख, खालचे टेंभे गावासाठी 1 कोटी 6 लाख, वरचे टेंभे गावासाठी 90 लाख तर अंबासनसाठी 93 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध होताच प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार असून पाईपलाईनव्दारे शुध्द व मुबलक पाणीपुरवठा केला जाईल, असे कोर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या