Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी निधी देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

नागपूर | प्रतिनिधी Nagpur

- Advertisement -

महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणीत तसेच अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

YouTube video player

आज विधानसभेत भाजपचे आमदार राहुल कुल यांनी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतन आणि थेट प्रशिक्षणाबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी विचारण्यात आलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना निधी देण्याबाबत आश्वासीत केले.

दरम्यान, महाज्योतीमार्फत एकूण ११ अभ्यासक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी सहा अभ्यासक्रम ऑफलाईन तर पाच अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली.

पीएचडी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित विद्यावेतनसाठी ३० जून २०२५ पर्यंत सुमारे ३१ कोटी ९१ लाख रुपये वितरित करण्यात आले आहे. प्रलंबित राहिलेले विद्यावेतन टप्प्याटप्प्याने दिले जात असून नियमित विद्यावेतन मात्र वेळेवर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा, लष्करी भरती आदींसाठी प्रत्यक्ष वर्ग घेतले जातात. तर बँकिंग , स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड, शिक्षक पात्रता/सब्स्टिट्यूट टेस्टसारख्या परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते.

सर्व संबंधित परीक्षा ऑफलाईन असल्या तरी ग्रामीण आणि दूरवरच्या विद्यार्थ्यांना शहरात येऊन राहणे परवडत नसल्याने ऑनलाईन प्रशिक्षणाची सुविधा सुरू करण्यात आली असल्याचेही सावे यांनी सांगितले.महाज्योतीमार्फत यूपीएससी प्रशिक्षणासाठी १०० आणि एमपीएससीसाठी ४०० विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण कोटा निश्चित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब दिला जात असून सिमकार्डसाठी आवश्यक रक्कम डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा केली जाते. यामुळे ऑनलाईन शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, हा उद्देश आहे. ऑनलाईन प्रशिक्षणामुळे उपस्थिती १०० टक्के नोंदवता येते, याकडेही सावे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी विजय वडेट्टीवार, रणधीर सावरकर, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी उपप्रश्न विचारले.

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...