Sunday, May 19, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

जन्मतारखेनुसार भविष्य..

- Advertisement -

27 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, हर्शल, मंगळ या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास कन्या आहे. मंगळाच्या प्रभावामुळे स्वभवातील दोन गोष्टी इतरांना खटकतील. एक उतावळेपणा, दुसरा स्पष्टवक्तेपणा. लोकांचे दोष त्यांच्या तोंडावर सांगितल्यामुळे शत्रुंची संख्या नेहमीच वाढती राहील. दुसर्‍याच्या हाताखाली किंवा निदर्शनाप्रमाणे काम केल्यास जीवनात चांगले यश मिळेल. न्यायशीलता चांगली आहे. इतरांवर झालेल्या अन्यायामुळे लढा पुकाराल. आयुष्याच्या पूर्वार्धात आयुष्यात अनेक अडचणी येतील. वयाच्या 37 वर्षानंतर मात्र शेअर्स किंवा बिझनेसद्वारे भरपूर पैसा मिळेल.

28 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, सूर्य, हर्षल, या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी असून लवकर विचार करून त्वरीत निर्णय घेण्याची शक्ती फार चांगली आहे. नुसतेच निर्णय घेऊन थांबत नाही तर त्यांचे चिकाटीने व नेटाने प्रयत्न करून कृतीत रूपांतर करतात. उद्योगशीलता चांगली आहे. दिलेला शब्द पाळणे फार आवश्यक आहे. चेहर्‍यावर सदैव प्रसन्नता झळकेल. ते तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाचे रहस्य आहे. शासन, महापालिका, वित्तीय विभाग, यापैकी कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळू शकेल.

29 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. ग्रहांची चौकट बौद्धिक उन्नतीसाठी चांगली आहे. बौद्धिक सामर्थ्याने सामाजिकदृष्ट्या लोकांच्या मनात विश्वासाचे वातावरण तयार कराल. कोणत्याही प्रकारचे करिअर स्विकारले तरी त्यात बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्तम प्रगती करू शकाल. धूर्तपणा, मुत्सद्दीपणा, याच्या जोरावर व्यवस्थापनाच्या क्षेत्रात फार पुढे जाऊ शकाल. प्रत्येकाला विश्वासात घेऊन आपुलकीने काम केल्याने लोक तुमच्यावर फार प्रेम करतील. साहजिकच शत्रुंची संख्या कमी राहील. विरोधकालाही मदत करण्याची वृत्ती राहील. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. पण तुम्हाला पैशाची खरी किंमत कळणार नाही. कारण तुमच्याकडे स्वतःहून पैसा चालत आला आहे.

30 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, बुध, हर्शल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. महत्त्वाकांक्षा फार दांडगी आहे. साध्या यशाने तुमच्या मनाचे समाधान होणार नाही. काही तरी भव्यदिव्य करून दाखवावे अशी मनात टोचणी लागली असेल. आदर्शवादी स्वभावामुळे अनेक मित्र लाभतील. शासन, राजकारण, महानगरपालिका, यापैकी जनतेशी वारंवार संपर्क येईल अशा कामात प्रचंड यश मिळेल. अचूक निर्णयाच्या जोरावर केलेल्या गुंतवणूकीतून मिळणार्‍या फायद्याच्याद्वारे आर्थिक स्थिती मजबूत होत जाईल. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे.

31 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, बुध,सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. तुम्ही फार स्वतंत्र बाण्याचे आहात. केवळ विचारांनीच नव्हे तर कृतीने देखील सर्वच बाबतीत विचारांचे वेगळेपण इतरांच्या लक्षात येण्यासारखे राहील. त्यामुळे काही लोकांना स्वभाव विचीत्र वाटेल. कामाच्या दृष्टीने इतरांशी सहजपणे जमवून घेता येणार नाही. कुटूंबातील लोक आणि नातेवाईक यांच्याशीही जमवून घेता येणार नाही. कारण दुसर्‍यांनी आणलेले दडपण मुळीच सहन होत नाही. आर्थिक बाबतीतही अशीच परिस्थिती राहील. पैशाचे विशेष आकर्षण नसले तरी पैसा तुमच्याकडे स्वतःहून येईल.

1 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, हर्षल, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. तुम्हाला निसर्गाचे फार प्रेम असून प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणे आवडते. उद्योगशील स्वभावामुळे कामाशिवाय स्वस्थ बसणे, जमणार नाही. भाषा प्रभुत्व चांगले राहील. आवडीचे करिअर घडवण्यासाठी बराच वेळ लागेल. तत्पूर्वी अनेक वेगवेगळ्या करिअरमध्ये नशीब आजमावण्यचा प्रयत्न कराल. आयुष्याच्या मध्यानंतर योग्य करिअर प्राप्त झाल्यावर झपाठ्याने प्रगती होईल. अर्थप्राप्ततीची तीव्र इच्छा असूनही तशी संधी मिळण्यास बराच वेळ लागेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन केल्यामुळे उच्चपद प्राप्तीद्वारे अधिक अर्थप्राप्तीची संधी प्राप्त होईल.

2 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र,नेपच्यून, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. कल्पनाशक्ती चांगली असून बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण आहे. मात्र वारंवार बदल करण्याच्या तुमच्या स्वभावमुळे त्याचा घ्यावा तितका फायदा घेता येणार नाही. साधी रहाणी उच्च विचारसरणी असे तुमचे जीवन राहील. आत्मविश्वास कमी असल्यामुळे जीवनात इतरांना मागे पाडून पुढे जाणे जमणार नाही. पण आत्मविश्वासात वाढ केल्यास जीवनात उत्तम यश मिळवू शकाल. फुलांची, बागेची, निसर्गसान्निध्याची आवड राहील. मोठमोठ्या कंपन्यामध्ये चांगल्या पदावर काम केल्यामुळे आर्थिकस्थिती उत्तम राहील. अभ्यास केल्यास व योग्य मार्गदर्शक मिळाल्यास टिकात्मक लेखनाद्वारे अर्थप्राप्ती होऊ शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या