Thursday, May 15, 2025
Homeशब्दगंधकसोटीचे क्षण

कसोटीचे क्षण

– अंजली राजाध्यक्ष

- Advertisement -

स्पिती व्हॅली ही यात्रा खरे तर चाळिशी- पन्नाशीच्या आसपास व्हायला हवी (जेव्हा तब्येतीच्या व खाण्यापिण्याच्या फार तक्रारी नसतात). येथे वाहने वर जाऊ शकणार नाही असे कठीण चढ व चाली भरपूर आहेत.

आमच्या समूहात टूर लीडर साने सर व दोन तरुण जोडपी सोडल्यास सर्व साठीच्या वरचे व शुगर, बी.पी. त्रास असणारे होते. परंतु सर्वांचीच उत्तम शिस्त, फिटनेस व खाण्यावर ताबा असल्याने ती अडचण फार आली नाही. पण भविष्यकालीन पर्यटकांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या संबंधीची सूचना ही तेथे वाचनात आली. आठ दिवसांच्या आमच्या प्रवासात तीन वाहनचालक व एकदा बसच बदलावी लागली. चंदिगड या शेवटच्या ठिकाणची काही स्थळे बघायची राहून गेली व त्या अनिश्चिततेचा मनस्ताप झाला तो वेगळेच. स्पिती व्हॅलीवरून कुंझुमला पासवरून आम्हाला कुलू मनालीला उतरायचे होतो. ती खिंड पूर्ण बर्फाच्छादित असल्याने तो पट्टा आमचा पाहायचा राहिला याचे वैफल्यही अनेकांच्या मनात राहिले. असो, हे मुद्दाम सांगण्याचे कारण म्हणजे परिस्थिती काय व केव्हा एखादे आव्हान समोर ठेवेल सांगता येत नाही. तर या गोष्टीचाही विचार जरूर व्हायला हवा.

प्रचंड थंडी, विरळ हवा व थोडेफार शारीरिक कष्ट याने सहनशीलता थोडी कमी होते (पाच-दहा पावले टाकली तरी किती मैल चालून आलो असे वाटे). हे सर्व माझे वैयक्तिक अनुभव मी शेअर केले आहेत. भविष्यकालीन पर्यटकांनी यावर निश्चित विचार करावा, यासाठी हे हितगुज केले.

समाप्त

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ए.आय. तंत्रज्ञानासह एसटीच्या ताफ्यात ‘स्मार्ट बस’ येणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai एसटी प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या 'स्मार्ट बसेस ' लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार असल्याची माहिती...