Friday, May 3, 2024
Homeजळगावग. स. च्या १४ संचालकांचे राजीनामे

ग. स. च्या १४ संचालकांचे राजीनामे

जळगाव – Jalgaon :

जिल्हा सहकारी नोकरांची पतपेढीच्या सत्ताधार्‍यांसह विरोधी गटातील १४ संचालकांनी सामूहीकरित्या राजीनामे जिल्हा उपनिबंधकांकडे गुरुवारी सादर केला.

सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या मनमानी कारभारला कंटाळून लोकसहकार गटाच्या ५ संचालकांनी सहकार गटाच्या संचालकांसोबत राजीनामा दिला असून यापुढेही सहकार गटाला आमचा पाठिंबा राहणार.

- Advertisement -

विलास नेरकर, सत्ताधारी गटाचे संचालक.

ग. सच्या संचालकांनी राजीनामे दिल्यामुळे सहकारक्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी राजीनामासत्राबाबत दुजोरा दिला.

शासकीय नोकदारांची पतपेढी म्हणून ग. स. सोसायटीकडे बघितले जाते. परंतु आता यात देखील राजकीय पुढार्‍यांचा समावेश झाला असून ग. स.च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गदारोळा होणे हे नित्याचेच झाले आहे.

सन २०१५ ते २०२० या कालावधीसाठी २१ संचालक निवडून आले होते. ४ जून रोजी संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. परंतु कोविडच्या पाश्‍वृभूमीवर शासनाने निवडणुक घेण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

सोसायटीचे विद्यमान काळजीवाहू अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील हे संचालक मंडळाच्या सदस्यांना विश्‍वासात न घेता संस्थेच्या व सभासदांच्या हिताविरोधात एकतर्फी निर्णय घेत आहेत.

तसेच संचालकांना अरेरावी व अपात्रतेची भाषा वापरुन त्यांच्यासोबत हुकूमशाही पद्धतीने कामकाज करुन अध्यक्षपदाचा गैरवापर करुन संस्थेचे व सभासदांच्या हिताविरोधात निर्णय घेत आहे. त्यामुळे बहुतांश संचालकांचा त्यांच्यावर विश्‍वास राहिला नाही.

तसेच संचालक मंडळाचा कार्यकाळ संपलेला असून १४ संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा आज जिल्हा उपनिबंधक संतोष बीडवई यांच्याकडे सादर केला.

राजीनामा देणारे संचालक

सत्ताधारी गटाचे विलास नेरकर, तुकाराम बोरोले, सुनिल अमृत पाटील, सुनिल निंबा पाटील, विश्‍वास सुर्यवंशी यांच्यासह सहकार गटाचे गटनेते उदय पाटील, अजबसिंग पाटील, कैलास चव्हाण, महेश पाटील, देवेंद्र पाटील, विद्यादेवी पाटील, विक्रमादित्य पाटील, भाईदास पाटील, रागिणी चव्हाण या १४ संचालकांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.

अपात्रतेच्या धमकीमुळे दिला राजीनामा

विरोधी गटाचे विरोध करण्याचे कामच आहे. सत्ताधारी गटाचे संचालक आमच्यासोबत आल्याने लोकशाही मार्गाने आम्ही एकत्रीत आलो. अध्यक्षांकडून आम्हाला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नव्हते. विचारणा केल्यास अपात्रतेची धमकी त्यांच्याकडून दिले जाते. त्यामुळे अध्यक्षांच्या मनमानी कारभारला कंटाळून सत्ताधारीसह विरोधी गटातील १४ संचालकांनी राजीनामा सादर केला असल्याची प्रतिक्रीया सहकार गटाचे गटनेते उदय पाटील यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या