Thursday, May 2, 2024
Homeजळगावसरकार गटाच्या ‘उदय’ समोर आव्हाने

सरकार गटाच्या ‘उदय’ समोर आव्हाने

आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या ग.स.सोसायटीने शंभरी पार केली असून ग.स.सोसायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला अनेकांनी नवसंजीवनी देवून समृद्धी आणि वृद्धीचा वारसा जोपासण्याची परंपरा सुरु ठेवली आहे.

सुरुवातीला सहाकार गटातून अनेकांना संचालक होण्याची संधी मिळाली. मात्र, कालांतरांने गटातटाच्या राजकारणामुळे उभी फुट पडून वेगळ्या गटाची निर्मिती झाली आणि एका पाठापोठात लोकमान्य गट, लोकशाही गट, प्रगती गट आणि आता लोकसहकार अशी गटाची निर्मिती कालानुरुप होत गेली.

- Advertisement -

सहकार गटाची धुरा अनेक वर्षांपासून बी.बी.आबा पाटील यांच्या खांद्यावर होती. आता वयोमानानुसार सहकार गटाचे नेतृत्व उदय पाटील यांच्याकडे देण्यात आले. आगामी होणार्‍या ग.स.सोसायटीच्या निवडणुकीसाठी सहकार गटाच्या ‘उदय’समोर उमेदवारांसह पुन्हा सहकार गटाची सत्ता कायम ठेवण्याचे मोठे आव्हाने राहणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सहकार गटाचे नेते बी.बी.पाटील आणि लोकमान्य गटाचे नेते स्व.हणुमंतराव पवार अशी पारंपरिक लढत रंगत होती. त्यानंतर लोकशाही गट,प्रगती गट अशा गटाची निर्मिती झाली मात्र, सहकार क्षेत्रातील ग.स.सोसायटीवर सत्ता सर करण्यात अपयश आले.

सहकार गटाला वारसा आणि वसा लाभलेल्या सहकार गटाचे नेते बी.बी.पाटील यांनी नेतृत्वाची धुरा आता दुसर्‍याच्या खांद्यावर देण्याची वेळ आली आहे आणि बी.बी.पाटील यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून उदय पाटीलतर गटनेते पदी अजबसिंग पाटील यांच्याकडे सहकार गटाची सूत्रे सोपविली.

सहकार गटातील एकनिष्ठ दोन्ही संचालकांकडे बी.बी.पाटील यांनी धुरा सोपविली आहे. आता सहकार गटासमोर लोकमान्य गट,लोकसहकार गटासह पाच गटांचे आव्हान आगामी ग.स.सोसाटीच्या निवडणुकीत पेलावे लागणार आहे. त्यातच शिक्षक सेनेचा महाविकास गटाची निमिर्ती झालेली असून त्यांनी दंड थोपटून मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. ग.स.सोसायटीच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच गटांकडून मोर्चेबांधणी करीत कॉर्नर बैठकांना सुरुवात केली आहे. त्यामुळे ग.स.सोसायटीच्या निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून त्यादृष्टीने सहकार गटाच्या ‘उदय’नेतृत्वाचा कस लागणार आहे.एवढे मात्र खरे.

- Advertisment -

ताज्या बातम्या