Tuesday, February 24, 2026
Homeक्राईमCrime News : गजराजनगर येथे विनापरवाना गॅस टाक्यांचा साठा पकडला

Crime News : गजराजनगर येथे विनापरवाना गॅस टाक्यांचा साठा पकडला

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गजराजनगर फाटा परिसरात घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा विनापरवाना साठा करून ज्वलनशील पदार्थाबाबत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एकावर कारवाई करून तीन लाख 10 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर तांदळे यांनी फिर्याद दिली आहे. गजराजनगर फाटा, वारूळवाडी रस्त्यावर घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा विनापरवाना साठा करून ठेवला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती. त्यांनी एका पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

- Advertisement -

पथकाने शनिवारी (21 फेब्रुवारी) सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास गजराजनगर फाटा, वारूळवाडी जाणार्‍या रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये अजिम इकबाल खान (वय 33, रा. गजराजनगर, ता. अहिल्यानगर) हा घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा परवानगीशिवाय साठा करताना आढळून आला. तसेच संबंधित टाक्या रिक्षामध्ये भरताना ज्वलनशील पदार्थाबाबत आवश्यक ती खबरदारी न घेता स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा धोकादायक पध्दतीने काम करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात एका रिक्षा चालकाचाही सहभाग असून त्याचा पूर्ण तपशील अद्याप समोर आलेला नाही.

YouTube video player

कारवाईदरम्यान पोलिसांनी एचपी व भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या तसेच रिक्षा (एमएच 16 सीई 0908) असा एकूण तीन लाख 10 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अजिम खान याच्यासह अनोळखी रिक्षा चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

मध्यरात्री थरार! गावठी कट्ट्याच्या धाकाने दुचाकी पळविली

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात गावठी कट्टा दाखवत युवकास मारहाण करून दुचाकी व रोख रक्कम लुटल्याची घटना समोर...