Thursday, May 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुचाकीच्या डिक्कीतून पाच लाख रुपये लंपास

दुचाकीच्या डिक्कीतून पाच लाख रुपये लंपास

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

येथील प्रसिद्ध व्यापारी गोविंद अग्रवाल यांच्या स्कुटीच्या डिक्की मधून, अज्ञात चोरट्यांनी ५ लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली असून, या घटनेचा नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांचे शेतमालाचे पैसे वाटप करण्यासाठी अग्रवाल यांनी येथील एचडीएफसी बँकेतून पाच लाख रुपयांची रक्कम काढून आणली होती. बाजार समिती आवरा मधील, धान्य शेड जवळ आपली गाडी उभी करून पावती पुस्तकांची बॅग घेण्यासाठी अग्रवाल गेले असता याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी स्कुटीच्या डिक्कीतून रोख रक्कम लांबवली असल्याचे अग्रवाल यांच्या लक्षात आले.

गेले काही दिवसापासून, शहरात चोरीचे प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे भुयारी मार्गात एका वृद्ध व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून लुटले होते. शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून व्यापाऱ्यांची देखील लुट केली जात आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांना पोलीसांचा धाक राहिलेला नसल्याची चर्चा व्यापारी तथा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या