Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमCrime News : ‘तिरट’ खेळणारे 13 जुगारी पकडले; तोफखाना पोलिसांचा बोल्हेगावात छापा

Crime News : ‘तिरट’ खेळणारे 13 जुगारी पकडले; तोफखाना पोलिसांचा बोल्हेगावात छापा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगर परिसरातील चोभे कॉलनी येथे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी सोमवारी (17 नोव्हेंबर) सायंकाळी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी 13 जुगारींना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि वाहनांसह एकूण तीन लाख 98 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, भाऊसाहेब रफायल बोर्डे याच्या घराच्या आडोशाला काही लोक पैशांवर तिरट नावाचा जुगार खेळत आहेत. यानुसार, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून अचानक छापा टाकला. यावेळी दोन वेगवेगळ्या रिंगणात पैसे लावून जुगार खेळताना 13 जण आढळून आले.

YouTube video player

यामध्ये गणेश दशरथ गोरे, राजू बाबूभाई शेख, भाऊसाहेब रफायल बोर्डे, पिंटू प्रकाश ओहळ, नितीन मनोहर चाबुकस्वार, दीपक सुरेश नेटके, अजीज अकबर सय्यद, जमीर शौकत पठाण, सुधीर सुनील धांडे, राजू बाबासाहेब शिंदे, अनिल वसंत आव्हाड, लखन शंकर शिंदे आणि विकी विष्णू शिंदे यांचा समावेश आहे. निरीक्षक भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चाहेर, अंमलदार सुनील चव्हाण, नितीन उगलमुगले, भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, सुरज वाबळे, सुधीर खाडे, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, बाळासाहेब भापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...