Sunday, September 29, 2024
Homeनगरगणपती विसर्जन मिरवणुकीत घातपात करण्याचा डाव उधळला

गणपती विसर्जन मिरवणुकीत घातपात करण्याचा डाव उधळला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घातपात करण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये गुलालाच्या गोण्याखाली लपून ठेवलेली तलवार व काही घातक शस्त्रे तोफखाना पोलिसांनी जप्त केली आहेत. मंगळवारी (17 सप्टेंबर) रात्री सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात मिरवणुकीदरम्यान ही कारवाई केली.

- Advertisement -

याप्रकरणी उपनगराचा राजा मित्र मंडळाचा अध्यक्ष नितीन अंगत सापते (वय 24 रा. पद्मानगर, पाईपलाईन हाडको), त्याचा साथीदार पप्पू पाचारणे (रा. तागड वस्ती) व उपनगराचा राजा मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी नगर शहर व उपनगरात गणपती विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील उपनगर भागात असलेल्या काही गणेश मंडळांच्या आपसात असलेल्या अंतर्गत कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते. उपनगराचा राजा गणेश मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये गुलालाच्या गोण्याखाली तलवार व काही घातक शस्त्रे गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी लपवून ठेवलेली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती.

त्यांनी पथकाला सोबत घेत स्व: ट्रॉलीची झडती घेतली असता लोखंडी कोयता, लोखंडी पाईप, कटावनी व एक लोखंडी पाईपला सायकलचा गियर लावून केलेले घातक शस्त्रासह एक बेस बॉल खेळण्याचा दांडा मिळून आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कोकरे, सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत, हेमंत थोरात, उपनिरीक्षक शैलेश पाटील, अंमलदार तनवीर शेख, दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, अहमद इनामदार, रंजित बारगजे, सुनील आंधळे, प्रदीप बडे, सुरज वाबळे, बेरड, वसीम पठाण, सुमीत गवळी, शिरीष तरटे, सतीष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतीष भवर, राहुल म्हस्के, शफी शेख, संदीप गिर्‍हे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या