Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यालाडक्या बाप्पाचे आज आगमन

लाडक्या बाप्पाचे आज आगमन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरलेयत… आणि आता याचाच उत्साह राज्यभरातल्या बाजारपेठांमध्येही दिसून येतोय… गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा या भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्यात… गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आलीय.. पूजेसाठी लागणारी फुले आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची गर्दीच गर्दी बाजारपेठांमध्ये दिसून येतेय… करोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त असा गणेशोत्सव साजरा होत असल्याने मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे व्यावसायिकांत समाधानाचे वातावरण आहे.

- Advertisement -

मूर्ती स्थापनेचा मुहूर्त सकाळी 11.5 ते दुपारी 1.38

नाशिक शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. शहरात तीनशेच्यावर मंडळांनी आतापर्यंत परवानगी घेतली आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साह ओसंंडून वाहत आहे. सार्वजनिक मंडळांत देखावे निर्माण केले जात असून त्यावर अंतिम हात फिरवला. घरोघरी गणपतींच्या आगमनाची तयारी होतआहे.

बुधवारी सकाळपासून ढोलताशांच्या निनादात शहरातून गणपतींची मूर्ती घरी नेली जाणार आहे. गणेशाची छोटी मूर्ती, श्रीफळ, कापड, कापसाची माळ, हार, सुट्टी फुले व नाणी, अत्तर, अगरबत्ती, कापूर, दूर्वा, हळदी-कुंकू-अबीर-गुलाल, दिवा, तेल, समई, वाती, फळे, पंचामृत, नैवेद्य, चंदन, अष्टगंध, पळी, पंचपात्र, जानवे, शमीपत्रे, आंब्याची डहाळी, ताम्हण, कलश, शंख, घंटा, अक्षता आदी साहित्य विक्रेत्यांनी रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, नवीन नाशिक, सातपूर, नाशिकरोड, द्वारका भागात दुकाने सजली आहे.

बाजारपेठेत वाहतूककोंडी

गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने नाशिक शहरातील रविवार कारंजा, दहीपूल, तिवंधा चौक परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती. प्रवेश बंद असतानाही अनेक दुचाकी, चारचाकी वाहनधारक रेडक्रॉसच्या सिग्नलवरून आर.के.कडे विरुद्ध दिशेने जात होते. तसेच बाजारपेठेतील या गर्दीत काही नागरिकांनी त्यांच्या दुचाकी बाजारपेठेत रस्त्याकडेला उभ्या केल्या होत्या. चालण्यास अडथळा निर्माण होत असल्याने गर्दीत भर पडत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या