Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रGanesh Festival : गणपती विसर्जनादरम्यान राज्यातील विविध भागांत दुर्घटना

Ganesh Festival : गणपती विसर्जनादरम्यान राज्यातील विविध भागांत दुर्घटना

मुंबई | Mumbai

- Advertisement -

एकीकडे राज्यभरात गणपती विसर्जनाची (Ganpati Vasarjan) धामधूम सुरु असताना दुसरीकडे विसर्जनावेळी राज्यातील विविध भागांत दुर्घटना घडल्या आहेत. गणपती विसर्जनावेळी काही युवकांचा (Youth) पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाला आहे. तर काल धुळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली येऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : नाशकात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; वालदेवी नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू

यात नाशिक शहरातील पाथर्डी परिसरामधील (Pathardi Area) नांदूर रस्ता वालदेवी नदीवर (Valdevi River) गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विसर्जन करीत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली आहे. ओंकार चंद्रकांत गाडे (२३)व स्वयंम भैया मोरे (२४) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तसेच धुळ्यातील चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीतील ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालकांचा मृत्यू झाला. परी शांताराम बागुल (१३), शेरा बापू सोनवणे (६) आणि लड्डू पावरा (३) असे मृत्यू झालेल्या बालकांची नावे आहेत.

हे देखील वाचा : Rahul Gandhi : “त्यांच्या जिभेला चटके…”; आमदार संजय गायकवाडांनंतर भाजप खासदाराचे राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

तर अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील विळद गावातील साकळाई तलावात काल सायंकाळी गणपती विसर्जनादरम्यान दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.अजिंक्य नवले आणि केतन शिंदे अशी मृत युवकांची नावे आहेत. स्थानिक नागरिक आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले आहे. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : Nashik News : इंदिरानगर परिसरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

तसेच अकोला जिल्ह्यातील (Akola District) बाळापूर आणि म्हैसांग येथील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनावेळी दोघांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.यात म्हैसांग येथील गणेश गायकवाड (१८) या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. तर बाळापूर शहरातील सुरज माणिक तायडे (२५) या युवकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.याशिवाय विरारमध्ये गणपती विसर्जन करताना अमित सतीश मोहिते (२४) या गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा : One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्तावाला कॅबिनेटचा ‘ग्रीन सिग्नल’?

धुळे, अकोल्याप्रमाणेच अमरावतीतही (Amravati) गणेश विसर्जनावेळी दुर्दैवी घटना घडल्या आहेत.यात अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील इसापूरचे रहिवाशी असलेले दोन गणेश भक्त गणपती विसर्जनासाठी गेले होते. त्यावेळी पूर्णानगर नदीपात्रात दोघेही पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. मयूर गजानन ठाकरे (२८) आणि अमोल विनायक ठाकरे (४०) असे वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत. घटनास्थळी आसेगाव पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे. तर अन्य एका घटनेत जिल्ह्यातील दारापूर येथील संजय पवार हा युवकही बुडाला आहे.

हे देखील वाचा : दशकभरानंतर जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला सुरुवात, मतदारांमध्ये उत्साह

त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरच्या घाणेगावमध्ये गणेश विसर्जनावेळी तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. अभय सुधाकर गावंडे (२१) असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय गावंडे, कुणाल कापसे, अभिषेक कापसे, रुपेश कंधारकर हे चारही मित्र गणरायाचे विसर्जन करण्यासाठी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरातून निघाले होते. वाळूज परिसरात असलेल्या घाणेगाव तलावामध्ये गणरायाला विसर्जन करण्याचे चौघांचे ठरले होते.गणरायाचे विसर्जन करण्यासाठी चौघेही तलावात उतरले. यावेळी अभय हा तलावात पुढे गेला. पुढे जाताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या