Friday, October 23, 2026
Homeदेश विदेशOne Nation One Election : 'वन नेशन, वन इलेक्शन' प्रस्तावाला कॅबिनेटचा ‘ग्रीन...

One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्तावाला कॅबिनेटचा ‘ग्रीन सिग्नल’?

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation One Election) चा दिलेला नारा पूर्ण होणार आहे.

- Advertisement -

माजी राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती माहिती समोर आली.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ संदर्भात राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) कायदा करण्याच्या तयारीत आहेत. एनडीएतील सर्व पक्षांचे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ पाठींबा असल्याचे देखील सांगितले जात आहे.

त्यामुळे हा कायदा कधीपासून लागू होईल, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील महत्वाच्या नेत्यांनी याआधीच वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला सहमती दर्शवली होती.

ताज्या बातम्या

महिला

Accident News: राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनरची दुचाकीला धडक; महिला वकिलाचा अपघाती मृत्यू

0
नवीन नाशिक | प्रतिनिधीकामासाठी घराबाहेर पडलेल्या महिला वकिलाच्या आयुष्याचा प्रवास राणेनगर उड्डाणपुलावर अचानक थांबला. मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर शुक्रवारी (दि. २३) सकाळी कंटेनरने दुचाकीला...