Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGanesh Visarjan 2025 : विसर्जन सोहळ्याला गालबोट; राज्यात सात जणांचा मृत्यू

Ganesh Visarjan 2025 : विसर्जन सोहळ्याला गालबोट; राज्यात सात जणांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर राज्यभरात काल (शनिवारी) लाडक्या गणपती बाप्पाला (Ganpati Bappa) निरोप देण्यात आला. तर दुसरीकडे पुणे, मुंबईमध्ये (Pune and Mumbai) अद्यापही गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणुका सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याने विसर्जन सोहळ्याला गालबोट लागले आहे.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील (Pune District) खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे गणेश विसर्जनावेळी दोन युवकांचा तर बिरदवडी येथील विहिरीत एक जण आणि शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत एक जण अशा वेगवेगळ्या घटनांत एकूण चार जणांचा बुडून दुदैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. तसेच मुंबईच्या (Mumbai) साकीनाका परिसरातही मिरवणुकीदरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे. यात विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.

YouTube video player

तर नांदेडमध्ये (Nanded) देखील विसर्जनासाठी गेलेल्या तिघांपैकी दोन जण पाण्यात वाहून गेले. यावेळी घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ पथक, महसूल विभाग, तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधारामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण झाला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती, मात्र बुडालेल्या तरुणांचा काहीही थांगपत्ता लागलेला नव्हता.

त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील (Thane District) शहापूर (Shapur) येथील आसनगाव मुंडेवाडी येथील भारंगी नदीच्या गणेश घाटावर पाच जण पाण्यात बुडाले. त्यापैकी दोघांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून, दोघे बेपत्ता आहेत. शहापूर पोलिस आणि जीवरक्षक पथकाकडून मदत आणि बचाव कार्य सतत सुरू आहे.

तसेच चंद्रपूरमध्येही (Chandrapur) विसर्जन मिरवणुकीवेळी दुर्घटना घडली आहे. गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना इराई नदीवरील भटाडी पुलावर घडली. दीक्षांत मोडक (१८) असे मयत युवकाचे नाव असून, तो चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर येथील रहिवासी आहे. प्रशासनाकडून युवकाचा मृतदेह शेधण्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...