Sunday, May 19, 2024
Homeजळगावचिनावल येथे गणेश विसर्जन शांततेत

चिनावल येथे गणेश विसर्जन शांततेत

चिनावल ता रावेर ( वार्ताहर ) –

संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या चिनावल येथील गणेश उत्सवाचे दि. ६ रोजी ७ व्या दिवशी भव्य गणेश विसर्जन मिरवणूक द्वारे रात्री उशिरा पर्यंत विसर्जन शांततेत पार पडले.

- Advertisement -

दिनांक ६ रोजी म्हणजेच ७ व्या दिवशी चिनावल येथील गणेश विसर्जन कोरोना काळानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात गावातील १६ गणेश मंडळांनी अत्यंत शिस्तबद्ध व शांततामय रितीने सवाद्य मिरवणूक द्वारे पारंपरिक गावातील विसर्जन मिरवणूक काढत बाप्पा ला भावपूर्ण निरोप दिला या वेळी गणेश भक्ताचा उत्साह ओसंडून वाहत होता महाराष्ट्र भरातून बोलावलेल्या डिझेल प्लस बॅनजो प्रेक्षकांचे आकर्षण ठरले होते तर मिरवणूक बघण्यासाठी पंचक्रोशीतील तरुण भाविकांमुळे चिनावल ला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

कोरोना नंतर प्रथमच गावात वाजत गाजत मोठी मिरवणूक असल्याने व पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने संवेदनशील गाव असल्याने गावात गणेश विसर्जनासाठी तगडा बंदोबस्त लावला होता गावातील १६ गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभागी झाले होते पोलिस प्रशासनाने दिलेल्या नंबर प्रमाणे सकाळी ११ वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री १० नंतर ही शांततेत सुरू होती.

दरम्यान गावातील सुयोग , नूतन , नवयुवक , समर्थ ,परिस ,मरिचय , नवनगर , विठ्ठल ,श्री विठ्ठल ,न्यू भारत ,क्रांती ,हिमधवल , आदर्श ,न्यु प्रभात , अमर , जागृती , भारत प्रिती , या गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभागी झाले होते. सदर वेळी जळगाव जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , फैजपूर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ कृणाल सोनवणे , सावदा पो स्टे चे सपोनि देविदास इंगोले, पो उप निरीक्षक समाधान गायकवाड , जावळे , रावेर , फैजपूर, वरणगा ,निभोरा येथील पोलिस अधिकारी चिनावल येथे तळ ठोकून होते तर एस आर पी, ही आर एफ, स्थानिक पोलीस, होमगार्ड , सी सी टी व्ही व ड्रोन कॅमेरा च्या नजर खाली आर एस एफ १०२ बटालियन मुंबई चे श्री शशीकांत , सहाय्यक संतोष कुण्यास्त ,विधी शाखेचे गुलानसिह झारिया यांनी बंदोबस्त साठी सहकार्य केले. अश्या तब्बल शेकडो पोलिसांचा फौजफाटा येथील गणेश विसर्जनासाठी तैनात होता या वेळी गणेश मंडळांनी शांततेत व आनंदाने रात्री उशिरा श्री राम निरोप दिला या गणेशोत्सव व विसर्जन कामी येथील पोलिस पाटील निलेश पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले , सरपंच , उपसरपंच परेश महाजन , यांचे सह गोपाळ नेमाडे , श्रीकांत सरोदे , बापू पाटील , हयातखान हाजी वायद खन ,शे निसार हाजी कुतुबुद्दीन, शे ईरफफान हाजी कुतुबुद्दीन,अस्लम खान हाजी शब्बीर खान ,शे अजगर ,सागर भारंबे , किशोर बोरोले , दामोदर महा जन , संदिप महाजन , भास्कर सरोदे, संदिप टोके गोपू नेमाडे, योगेश राजाराम भंगाळे , राजेश महाजन, ठकसेन पाटील , सतिश माळी , तसेच विज वितरण कंपनीच्या अभियंता श्रीमती योजना चौधरी यांचे ही या साठी सहकार्य लाभले गावातील सर्व स्तरातून प्रतिष्ठीत व्यक्ती यांनी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडणे कामी सहकार्य केले.

तर खिरोदा विभागाचे मडळाधिकारी जे डी भंगाळे , ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे , तलाठी श्रीमती लिना राणे , सावदा पो स्टे चे देवेंद्र पाटील , यशवंत डहाके , विनोद पाटील ,मजहर तडवी व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत कर्मचारी नी विसर्जन कामी परिश्रम घेतले तर जिल्ह्यात सर्वात मोठी मिरवणूक शांततेत पार पाडणे कामी गणेश मंडळ पदाधिकारी तसेच गावातील सर्व स्तरीय पदाधिकारी नी अनमोल सहकार्य केल्याने प्रशासना तर्फे गावकऱ्यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या