Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याGaneshotsav 2023 : यंदा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सकाळी 11 वाजताच सरू होणार

Ganeshotsav 2023 : यंदा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सकाळी 11 वाजताच सरू होणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गणरायाचे आगमन होऊन 5 दिवस पूर्ण होत झाले आहे. तर प्रशासनाने आता विसर्जन मिरवणुकीची तयारीला सुरूवात केली असून दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करुन सुचना केल्या तर आज भद्रकाली पोलीस ठाण्यात विसर्जन मिरवणूक क्रमांक व इतर महत्वाच्या विषयांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

शहर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहा. आयुक्त धुमाळ, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Nashik Crime News : दोन संशयितांकडून सहा दुचाकी हस्तगत

पहिल्यांदाच या वर्षी गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक सकाळी 11 वाजेला सुरू होणार आहे. दरवर्षी मिरवणुकीची वेळ ही एक वाजेनंतर राहते. मात्र गणेश उत्सव मंडळाच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी आणि पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

यामुळे शहरातील मिरवणूक पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांना पूर्ण वेळ मिरवणूक पाहता येणार आहे. यावेळी गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, माजी महापौर विनायक पांडे, माजी उपमहापौर प्रथमेश गीते आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

बिबट्या चक्क भरवस्तीत शिकारीसाठी बसला ठाण मांडून

- Advertisment -

ताज्या बातम्या