Friday, September 20, 2024
Homeनाशिकगंगापूर धरण 'इतके' टक्के भरले; तर इतर धरणांतील असा आहे पाणीसाठा

गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले; तर इतर धरणांतील असा आहे पाणीसाठा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

जिल्ह्यात जूनपासून पावसाने (Rain) हजेरी लावली असली तरी पावसाने पाहीजे तसा जोर धरलेला नाही. काही धरणांमध्ये (Dam) १०० टक्के पारी भरले असले तरी जुलै संपेपर्यंत काही धरणाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतक्या’ महिलांनी भरले ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज

यात नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणाचा साठा ६२.६३ टक्के तर समुहाचा साठा ५३.९८ टक्के साठा आहे. नाशिकच्या २४ धरणांतील वापरा योग्य पाण्याची सध्याची स्थिती ३९.५६ टक्के एवढी आहे .ही चिंतेची बाब आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात (Trimbakeshwar Area) सकाळपासून जोरधार पाऊस सूरु असल्याने धरण साठ्यात त्यामुळे वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा : गंगापूर धरणात ‘इतके’ टक्के पाणीसाठा; जिल्ह्यातील इतर धरणांतील स्थिती मात्र चिंताजनक

दरम्यान, आतापर्यंत जिल्हात ४०४.१ मि.मी. म्हणजेच ८३.६ टक्के एवढा पाऊस झाला आहे.तर नाशिक विभागात (Nashik Division) एकूण ३८५.९ मिली लिटर म्हणजेच १०७.७ टक्के एवढा पाऊस नोंदवला आहे.

हे देखील वाचा : Uddhav Thackeray : “एक तर तू राहशील नाहीतर मी”; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना गर्भित इशारा

कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा ?

गंगापूर- ६२.६३ टक्के, कश्यपी – ३२.०२ टक्के, पालखेड – ४६.६५ टक्के, करंजवण – २१.६९ टक्के, वाघाड ३४.३६ टक्के, दारणा – ८५.३० टक्के, भावली- १०० टक्के, मुकणे- ३५.७१ टक्के, गिरणा – २७.५० टक्के, वालदेवी- ६८.०५ टक्के, कडवा – ८५.४३ टक्के, नांदुर मध्यमेश्वर- १०० टक्के, चणकापूर ३८.१५ टक्के, भोजापुर ४३.४९ टक्के

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या