Tuesday, March 25, 2025
HomeUncategorizedगरबा खेळतानाच हार्ट अटॅक आला अन् कोसळले, मन सुन्न करणारा Video व्हायरल

गरबा खेळतानाच हार्ट अटॅक आला अन् कोसळले, मन सुन्न करणारा Video व्हायरल

पुणे । Pune

सध्या नवरात्रौत्सवाची धुम सर्वत्र सुरू आहे. गरबा सध्या सर्वत्र खेळला जात आहे. मोठ्या संख्येने गरबा दांडिया उत्सवामध्ये लोक सहभागी होत आहेत. पण गरबा खेळताना पुण्याच्या चाकणमध्ये एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

गरबा खेळत असतानाच अचानक चक्कर येऊन खाली पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाकणमध्ये घडली आहे. या घटनेचा मन सुन्न करणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये छान नटून थटून नाचणारी ही व्यक्ती अचानक खाली कोसळते.

त्यानंतर या व्यक्तीसोबत असलेला मुलगा नेमकं काय झालं हे पाहण्यास जातो तर सदर व्यक्तीची शुद्ध हरपल्याचं समजतं. मात्र अन्य व्यक्त मदतीला येईपर्यंत या माणसाने प्राण सोडल्याचं दिसून येतं. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याचं नाव अशोक माळी असं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक माळी हे मूळ धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून ते सध्या चाकण परिसरात वास्तव्यास होते. नवरात्रीनिमित्त पुण्यातील राजगुरुनगरमध्ये गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गरबा कसा खेळला जावा यासाठी अशोक हे चिमुकल्या मुलांना प्रशिक्षण देत होते.

गरबा खेळत असताना अशोक माळी यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला. छातीत वेदना झाल्याने ते गरबा खेळता-खेळता अचानक जमिनीवर कोसळले. यावेळी स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अशोक माळी यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालय दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...