Thursday, May 7, 2026
Homeक्राईमJamkhed : गॅस एजन्सीची फसवणूक करणारा अटकेत

Jamkhed : गॅस एजन्सीची फसवणूक करणारा अटकेत

2 लाख दहा हजारांच्या 87 टाक्या जप्त

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

देवदैठणचे चिलगर इण्डेन गॅस एजन्सीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी विशाल कुडके (रा. पिठ्ठी ता. पाटोदा, जि. बीड) या आरोपीस खर्डा पोलीसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, 2021 ते 2024 दरम्यान चिलगर इण्डेन रा. देवदैठण या गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर टाक्याचे वाटप करणे व त्याची रक्कम वसूलीसाठी नोकरीस ठेवलेल्या कामगार आरोपी कुडके याने गॅस एजन्सीच्या 257 मोकळ्या इंडियन व भारत गॅस टाक्या 6 लाख 16 हजार, उधारी 2 लाख 49 हजार 853 रुपये, केशव भारत गॅस बीड यांच्याकडून घेतलेल्या भारत गॅसच्या 47 टाक्यांची रोख रक्कम 71 हजार 863 रुपये, बीड येथील गाळ्याचे भाडे 16 हजार रुपये अशी 9 लाख 70 हजार 966 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. गॅस एजन्सीचे मालक किसन संभाजी चिलगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी कुकडे याला अटक केली असून त्याच्याकडून 2 दहा हजारांच्या टाक्या जप्त केल्या आहेत.

ताज्या बातम्या

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि...