Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशGautam Adani : गौतम अदानींना पुन्हा झटका, टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

Gautam Adani : गौतम अदानींना पुन्हा झटका, टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

दिल्ली | Delhi

अमेरिकास्थित हिंडेनबर्ग संस्थेने (Hindenburg Research) कथित गैरव्यवहारांबाबत अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाला (Adani Group) प्रचंड मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

- Advertisement -

गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत टॉप-10 यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी (Gautam Adani) बाहेर फेकले गेले आहेत. अदाणी समूहासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. (Gautam Adani Slips to 10th In Global Rich List)

Accident news : कार-बसचा भीषण अपघात, महिलेसह चौघांचा मृत्यू

ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या माहितीनुसार, अदानींना एका दिवसात तब्बल ८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. २९ जानेवारी रोजी त्यांची नेटवर्थ ९२.७ अब्ज डॉलर्स होती. ती सोमवारी घसरून ८४.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यामुळे अदानींची या क्रमवारीत ११ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

Union Budget 2023 : संसदेतील अभिभाषणात राष्ट्रपती मुर्मू कलम ३७०, तिहेरी तलाकवर काय म्हणाल्या?

हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यापासून अदानी यांनी आतापर्यंत ३६.१ अब्ज अरब डॉलर इतकी संपत्ती गमावली आहे. त्यामुळे गौतम अदाणी आणि अदाणी समूहाचे पुढे होणार तरी काय? याबातब गुंतवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत जोरदार चर्चा आणि उत्सुकता आहे.

गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला, कॉन्सर्ट दरम्यानच घडला सारा प्रकार

हिंडेनबर्ग संस्थेने आपल्या अहवालात दावा केला आहे की, अदाणी यांच्या कंपन्यांनी केलेली गुंतवणूक आणि फुगलेला संपत्तीचा आकडा हा कर्जाच्या डोलाऱ्यावर उभा आहे. इतकेच नव्हे तर स्टॉक मार्केटमध्ये अदाणी समूहाच्या कंपन्यांचे समभाग हे चक्क ८५ % फुगवण्यात आले आहेत. त्यामुळे हा एक मोठा घोटाळा आहे. यावरुन अदाणी समूह आणि हिंडेनबर्ग यांच्या आरोप प्रत्यारोप आणि प्रश्नोत्तरांच्या फैरी झडत आहेत.

डॉक्टरांची कमाल! मेंदूमधून चक्क दगड काढला… वाचा ऑपरेशनची थरारक स्टोरी

- Advertisment -

ताज्या बातम्या