Monday, September 23, 2024
Homeमुख्य बातम्या'एफपीओ' रद्द का केला? गौतम अदाणींनी सांगितलं कारण

‘एफपीओ’ रद्द का केला? गौतम अदाणींनी सांगितलं कारण

मुंबई | Mumbai

- Advertisement -

भारतातील अब्जाधीश आणि अगदी काही दिवसांपर्यंत जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी कंपनीचा महत्त्वाकांक्षी ‘एफपीओ’ बाजारातून गुंडाळण्याचा निर्णय गुरुवारी रात्री जाहीर केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ज्यांनी या एफपीओची खरेदी केली, त्या गुंतवणूकदारांनाही धक्का बसला आहे.

तसेच एफपीओ खरेदीचे सर्व पैसे गुंतवणूकारांना परत केले जाणार असल्याचे अदानी समूहाने आधीच जाहीर केले आहे. मात्र, नेमकं अदाणींनी असं का केलं? याबाबत आता स्वत: गौतम अदानी यांनी पुढे येऊन या गुंतवणूकदारांशी (investors) संवाद साधत ‘एफपीओ’प्रक्रिया रद्द करण्यामागील कारण सांगितले आहे. त्यासंदर्भातील अदाणींच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.

अदानी यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, शेअर बाजारात (Stock Market) होणारी हालचाल आणि चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे कंपनीचा हेतू आहे. यामुळे आम्ही ‘एफपीओ’मधून मिळालेले पैसे परत करत असून यासंबंधीचा व्यवहार बंद करत आहोत. माझ्यासाठी गुंतवणूकदारांचं हित प्राथमिकता आहे. यासाठी गुंतवणूकदारांना संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी आम्ही ‘एफपीओ’प्रक्रिया मागे घेतली आहे. या निर्णयाचा आमचा सध्याचा कारभार आणि भविष्यातील योजनांवर काही फरक पडणार नाही. असे त्यांनी सांगितले.

तसेच सध्या शेअर बाजारात होत असलेल्या उलथापालथी आणि अदाणी समूहाच्या शेअर्सचा उलटा प्रवास यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता दिसत असून कंपनीचं पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर देखील अदाणींनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘हा निर्णय आमच्या सध्याच्या कामकाजावर कोणताही परिणाम करणार नाही. आम्ही यापुढेही प्रकल्पांवर वेळेत अंमलबजावणी सुरू करून ते पूर्ण करत राहणार आहोत. आमच्या कंपनीचे मूलभूत तत्व फार मजबूत आहेत. आमची संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य कायम आहे. कर्ज चुकवण्याचा आमचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे, असे अदाणी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या