Thursday, May 29, 2025
Homeब्रेकिंग न्यूजGautami Patil: हगवणेच्या बैलासमोर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता गौतमी पाटील म्हणते...

Gautami Patil: हगवणेच्या बैलासमोर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता गौतमी पाटील म्हणते…

पुणे | Pune
राज्यात सध्या वैष्णवी हगवणे हिचे आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत असून, सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या कोठडीत आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतानाच काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. राजेंद्र हगवणे यांनी आपल्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटील नाचल्याचा व्हिडीओ राज्यात चांगलाच व्हायरल झाला होता आणि त्यावरून गौतमीला अनेकांनी ट्रोल देखील केले होते. यावर आता गौतमीने मौन सोडले असून तिने या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे.

- Advertisement -

“वैष्णवीबाबत जे झाले ते अतिशय दुर्दैवी आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. अजून नेमके आरोपी कोण हे कळलेले नाही. पण आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. मी वैष्णवीच्याच बाजूने आहे,” असे गौतमी पाटीलने सांगितले आहे. मला कलाकार म्हणून त्या कार्यक्रमात बोलावले होते. आम्ही तिथे कला सादर करतो. मला त्या कार्यक्रमाचे पूर्ण मानधन मिळाले होते. आम्हाला त्यात घेऊ नका, आम्ही फक्त तिथे कला सादर केली होती,” असे गौतमी म्हणाली.

गौतमीने वैष्णवीच्या आरोपींना कडक शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे. “जे झालेय ते खूप चुकीचे आहे. या घटनेतून आपल्याला बरेच काही शिकायला मिळतेय. याप्रकरणी वैष्णवीचे वडीलसुद्धा खूप चांगले म्हणाले. प्रेमविवाहाबद्दल त्यांनी खूप चांगले मत मांडलेय. यातून खरेच शिकण्यासारखे आहे. ज्यांनी ही चूक केली, त्यांना कडक शिक्षा मिळायला हवी,” असे ती पुढे म्हणाली.

गौतमीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये स्टेजवर सुशील हगवणेचा फोटो होता. सुशील हा वैष्णवीचा दीर आहे. सध्या हगवणे कुटुंबातील सर्व सदस्य पोलीस कोठडीत आहेत. हगवणे कुटुंबीयांकडून हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ सुरू होता. ५१ तोळे सोने, चांदी, रोख रक्कम दिल्यानंतरही तिचा छळ कमी झाला नव्हता. लग्नाच्या अवघ्या दोन-तीन वर्षांतच वैष्णवीने जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले.

हगवणेंच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय
हगवणेंच्या वकिलांनी कोर्टात वैष्णवीचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌, ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे,” असे ते म्हणाले.

हगवणेंच्या वकिलाने म्हटले की, “वैष्णवीची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट वाचले गेले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा उंदीर मारण्याचे औषध खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता”.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या