Sunday, April 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVideo : पद्मश्री अशोक सराफांसाठी विमानात टाळ्यांचा कडकडाट; पायलट भाचीची भावुक करणारी...

Video : पद्मश्री अशोक सराफांसाठी विमानात टाळ्यांचा कडकडाट; पायलट भाचीची भावुक करणारी उद्घोषणा

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ अभिनेते आणि ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२७ मे) रोजी नवी दिल्लीत (New Delhi) आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. राष्ट्रपतींच्या हस्ते भारतातील ६८ प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

हा पुरस्कार स्विकारल्यानंतर अशोक सराफ दिल्लीहून मुंबईला (Delhi to Mumbai) रवाना झाले. यावेळी विमानात अशोक सराफांना एक भावूक करणारा अनुभव आला. त्यामुळे अशोक सराफांचे डोळे पाणावल्याचे दिसून आले. अशोक सराफ ज्या विमानाने मुंबईला येत होते त्या विमानाची फ्लाइट कॅप्टन त्यांची भाची अदिती परांजपे ही होती. यावेळी तिने अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) मिळाल्याबद्दल अशोक मामांसाठी खास घोषणा केली.

अदिती परांजपे (Aaditi Paranjape) म्हणाली की, “आजचा विमानप्रवास माझ्यासाठी खरंच खूप खास आहे कारण, माझे काका अशोक सराफ आपल्यासोबत या विमानातून प्रवास करत आहेत, ज्यांना अलिकडेच भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. मला खूप अभिमान वाटतोय की, मी आज त्यांना दिल्ली ते मुंबई असा प्रवास घडवणार आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की, प्लीज जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करा आणि त्यांचे स्वागत करा”, असे तिने म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Daily Deshdoot (@deshdoot)


दरम्यान, अदितीच्या या घोषणेनंतर विमानात (Plane) टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. तसेच अशोक सराफ यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. त्यानंतर हा व्हिडीओ अशोक सराफ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर (Instagram Account) देखील शेअर केला. तसेच सुप्रिया पिळगांवकर, हेमंत ढोमे, ऋतुजा बागवे, संकेत पाठक, आदित्य सरपोतदार, क्षिती जोग, सुपर्णा श्याम या कलाकार मंडळींनीही अदितीच्या व्हिडिओवर कमेंट करत लाडक्या मामांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव ?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1300 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समिती कांद्याची (Onion) 3196 गोण्यांची...