अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहर पोलीस व एलसीबीने कारवाई (LCB Action) करून तीन तरूणांकडून तीन गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुसे जप्त (Gavathi Katta And Cartridges Seized) केली आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) एक तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) दोन असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहिल्यानगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने एका तरूणाला बुधवारी सायंकाळी क्लेराब्रुस शाळेच्या मोकळ्या मैदानावर, बाँईज हायस्कूलच्या इमारतीच्या पायरीवर पकडले. प्रकाश हेमू वाघमारे (वय 40 रा. संजयनगर, काटवण खंडोबा, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे (Gavathi Katta And Cartridges Seized) मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. पोलीस अंमलदार महेश मगर यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केली. एलआयसी ऑफिसच्या पाठीमागे पंडित नेहरू विद्यालया जवळ एका तरूणाला पोलिसांनी पकडले. प्रकाश विठ्ठल मोरे (वय 20 रा. निंबोडी ता. नगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त (Gavathi Katta And Cartridges Seized) करण्यात आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरूवारी भिंगार नाला येथे एका तरूणाला पकडले. अजय अरूण साळवे (वय 41, रा. सदर बाजार, भिंगार) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व एक काडतुस जप्त केले असून त्याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट
पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांनी बुधवारी रात्री 11 ते गुरूवारी पहाटे पाच वाजेपर्यंत ऑल आऊट ऑपरेशन राबविले. यामध्ये गावठी कट्ट्यांसह 11 तलवार, चाकु, कोयता जप्त केले. वाहतुक नियमांचा भंग करणार्या 150 जणांना एक लाख 29 हजाराचा दंड केला. एक हजार 384 वाहनांची, 145 सराईत गुन्हेगारांची तपासणी केली. 55 ठिकाणी दारूच्या सात ठिकाणी जुगाराच्या व दोन ठिकाणी वाळूच्या केसेस केल्या. एक फरार व चार पाहिजे आरोपींना ताब्यात घेतले.