Tuesday, February 24, 2026
Homeनगरमध्यरात्री थरार! गावठी कट्ट्याच्या धाकाने दुचाकी पळविली

मध्यरात्री थरार! गावठी कट्ट्याच्या धाकाने दुचाकी पळविली

पाचपैकी दोघे अल्पवयीन, तिघे ताब्यात

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात गावठी कट्टा दाखवत युवकास मारहाण करून दुचाकी व रोख रक्कम लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन पोलिसांनी झडप घालत पाच आरोपींपैकी तिघांना अटक केली असून, दोघांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी दोघे अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अमिर हबिब शेख (वय 34, रा. माणिकदौंडी चौक) हे फ्लेक्स व्यवसाय करतात. त्यांनी 21 फेब्रुवारी रोजी रात्री आपली यमाहा लिबोरो (क्र. एमएच-16 डब्ल्यू 3319) घरासमोर उभी केली होती. 22 फेब्रुवारी रोजी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास बॅनर लावण्यासाठी बाहेर पडताच त्यांच्या दुचाकीजवळ पाच जण संशयास्पद हालचाली करताना दिसले.

YouTube video player

शेख यांनी विचारणा केली असता, तिघे जण दुचाकीची वायर तोडत असल्याचे आढळले. विरोध करताच, दोघांनी त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी एका आरोपीने कमरेतील गावठी कट्टा काढून त्यांच्या डोक्याला लावला व गप्प बस नाहीतर गोळी घालीन अशी धमकी दिली. भीतीपोटी शेख खाली बसले असता, त्यांच्या खिशातील 650 रुपये हिसकावण्यात आले. त्यानंतर आरोपींनी दुचाकी पळवून नेली, तर दोन जण पल्सरवरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे, नारायण बडे, ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव, इजाज सय्यद, निलेश गुंड, संदीप बडे, संदीप नागरगोजे, भगवान गरगडे, प्रल्हाद निळे या पोलीस पथकाने तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली. अटक केलेल्यांपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. एका सज्ञान आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. वापरलेली पल्सरही चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव करीत आहेत.

ताज्या बातम्या

Air Ambulance Crash : रांचीहून दिल्लीला जाणारे विमान कोसळले

0
रांची येथून दिल्लीकडे निघालेल्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा टेकऑफनंतर काही वेळातच संपर्क तुटून अपघात झाल्याचे समजते . झारखंडमधील चतरा जिल्हा व सिमरिया सीमेवरील जंगल परिसरात चार्टर...