Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसप्तशृंगी गडावरील घाट रस्ता 'या' कालावधीत राहणार बंद

सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता ‘या’ कालावधीत राहणार बंद

नांदुरी । वार्ताहर Nanduri

- Advertisement -

सप्तशृंगीदेवी गडावरील घाट रस्त्यात पावसाळ्यात काहीवेळेस दरड पडण्याच्या घटना घडत असतात. त्यातच पुढील काही दिवसात नवरात्रोत्सव असल्याने लाखो भाविक गडावर दर्शनासाठी जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शासनाकडून घाट रस्त्यावरील बाजूला संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरु केले आहे.

संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व नागरिकांच्या प्रवासाच्या सुरक्षेतेसाठी दि.23 सप्टेंबर 2024, 25 सप्टेंबर 2024, 26 सप्टेंबर 2024 या दरम्यान सकाळी ७ ते दुपारी १२ वाजे दरम्यान सप्तशृंगी गड ते नांदुरी या दहा किलोमीटरच्या घाट रस्ता वाहतुकीस बंद ठेवणार असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी अनुकुरी नरेश यांनी सांगितले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...