नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील घोडेगाव येथे नगर-औरंगाबाद रस्त्यावर घोडेगाव शिवार पीराच्या समोर टेम्पो-पिकअपचा
अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना काल रविवारी दुपारी 12 वाजता घडली आहे.
अधिक माहिती अशी की, या घटनेतील फिर्यादी नितीन शांताराम कोष्टी (वय 41) रा.लावावाडी ता.जि. नागपूर हे त्यांची बोलेरो पीकअप (एमएच 31 एफसी 4742) मधून चुलत भाऊ तुषार, आई भाग्यवती, मुलगी सृष्टी व मुलगा मनाल यांना त्यांच्या शिक्षणासाठी कल्याण येथे सोडण्यासाठी जात असताना दि.27 रोजी दुपारी 12 वाजता यातील.
आरोपीने त्याच्या ताब्यातील एलपीटी टेम्पो (एमएच 14 ईएम 5686) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून माझे पीकअप गाडीस पाठीमागून जोराची धडक देऊन माझे चुलत भाऊ तुषार शाम कोष्टी (वय 33) याचे मरणास तसेच मुलगा मनाल, मुलगी सृष्टी व आई भाग्यवती यांचे कमी अधिक दुखापतीस व दोन्ही गाडीचे नुकसानीस कारणीभुत झाला.
या फिर्यादीवरून आरोपी आप्पाराव रामचंद्र नळनर रा.रामतीरथ ता.लोहा,जि. नांदेड याचे विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 279, 337, 338, 427 सह मोटार वहातुक कलम 184, 134 (अ)(ब)/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत मनाल नितीन कोष्टी (वय 9), सृष्टी नितीन कोष्टी (वय 14), भाग्यवती शांताराम कोष्टी (वय 60), सर्व रा. लावावाडी ता.जि नागपूर हे जखमी झाले असून शनैश्वर ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल श्री. गावडे करीत आहेत.