Friday, November 22, 2024
Homeनगरघोडेगाव तालुका घोषित करण्याची मागणी

घोडेगाव तालुका घोषित करण्याची मागणी

तालुका मागणी प्रस्तावाला 180 दिवसांचा कालावधी पूण

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

स्वतंत्र तालुका मागणीबाबत सादर केलेल्या प्रस्तावाचा 180 दिवसांचा शासकीय कालावधी पूर्ण झाल्याने घोडेगाव तालुका घोषित करण्याची मागणी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी अपर मुख्य सचिव (महसूल) व वन विभाग यांचेकडे केली आहे. अधिक माहिती देताना श्री. वैरागर यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र तालुका निर्मिती प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्याचा कालावधी 180 दिवसांचा निश्चित केलेला असून विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी दि. 30 जानेवारी 2023 रोजी अपर मुख्य सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय यांचेकडे प्रस्ताव दाखल केला असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देशानुसार परिपूर्ण प्रस्तावाचा विहित कालावधी पूर्ण झालेला आहे.

- Advertisement -

नगर जिल्हा विभाजनामध्ये अनुक्रमे श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर ही नवीन जिल्हा मुख्यालयाची ठिकाणे घोडेगाव तालुक्यासाठी गैरसोयीची असल्याने घोडेगाव नवीन तालुक्याचा अहमदनगर जिल्ह्यात समावेश करावा, अशी मूळ मागण्या असून प्रस्तावित 53 ग्रामपंचायती पैकी अनुक्रमे सोनई, शिरेगाव, निंभारी, गोमळवडी, तामसवाडी, कारेगाव, नागापूर, खुणेगाव या आठ ग्रामपंचायतीचे ठराव विरोधात असले तरी घोडेगाव तालुक्यासाठी 46 ग्रामपंचायतीचे ठराव तहसील कार्यालय नेवासा येथे दाखल झालेले असल्याने भारतीय संविधानानुसार घोडेगाव तालुका निर्मिती कामी निर्णायक बहुमत मिळाले आहे. नवीन घोडेगाव तालुक्यासाठी सर्व शासकीय निकष पूर्ण झालेले असल्याने घोडेगाव तालुका घोषणेची मागणी आपण केलेली असल्याचे सुधीर वैरागर यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या