Thursday, May 2, 2024
Homeनगरमुलीच्या चेहर्‍याला कुत्र्याचा चावा

मुलीच्या चेहर्‍याला कुत्र्याचा चावा

बेलापूर |वार्ताहर| Belapur

अंगणात खेळत असलेल्या लहान मुलीच्या चेहर्‍यालाच पाळीव कुत्र्याने चावा घेतला असून अहमदनगर येथील दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत बेलापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

- Advertisement -

पढेगाव रोड शालोम चर्चच्या पाठीमागे दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी तीन च्या सुमारास आयेशा दस्तगीर शेख ही मुलगी खेळत असताना टायगर नावाच्या कुत्र्याने तिच्या तोंडाला व इतर ठिकाणी चावा घेऊन तिला गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत मुलीला प्रथम श्रीरामपूर येथील शिरसगावच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले.

चेहर्‍याची जखम फार मोठी असल्या कारणाने प्राथमिक उपचार करून त्या मुलीस नगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. जखमी आयेशास अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. कुत्र्याने त्या मुलीच्या गालाचाच लचका तोडला असून मुलीची तब्येत गंभीर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

याबाबत मुलीची आई निलोफर दस्तगीर शेख हिने बेलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून बेलापूर पोलीसांनी शेलार यांच्या विरुद्ध भादंवि कलम 289 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास बेलापूर पोलीस करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या