Monday, May 6, 2024
Homeधुळेमुलींनी सामाजिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या सबळ व्हावे!

मुलींनी सामाजिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या सबळ व्हावे!

धुळे Dhule। प्रतिनिधी

मुलींनी (Girls) आपले मानसिक मनोबल (mental morale) वाढविले पाहिजे. सामाजिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या सबळ होणे (Being financially strong) हे मुलींसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षणाशिवाय (education) पर्याय नाही. असे प्रतिपादन विधीज्ञ अ‍ॅड. रसिका निकुंभ (Adv. Rasika Nikumbha) यांनी केले.

- Advertisement -

येथील रोटरी क्लब धुळे फेमिना व रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळे क्रॉस यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय न्याय दिवसानिमित्त महिला सबलीकरण या विषयावर अ‍ॅड. रसिका निकुंभ या एसएनडीटी महिला महाविद्यालयात व्याख्यान बोलत होत्या.

पुढे बोलतांना अ‍ॅड. रसिका निकुंभ म्हणाल्या की, आजच्या आधुनिक युगात विद्यार्थिनींना आत्मविश्वासाची गरज आहे. त्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. महाविद्यालयीन जीवनातील सहजपणे आणि नकळत केलेल्या गोष्टी विवाहाच्या नंतर मोबाईलमुळे अडचणीत आणू शकतात. यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल असे मुलींनी वागू नये. महाविद्यालयीन जीवन जगत असतानाच विद्यार्थिनींना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. स्त्रियांना जेवढे अधिकार आहेत त्या अधिकाराचा गैरवापर न करता त्यांनी समाजात नीटनेटके वागावे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास पश्चिम खान्देश भगिनी सेवा मंडळाच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा, रोटरी क्लब ऑफ धुळे फेमिनाच्या अध्यक्षा मेघा कामेरकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडचे अध्यक्ष रोहित अजमेरा, सेक्रेटरी राहुल अग्रवाल, फेमिनाच्या सेक्रेटरी अनिता पाटील, राणू अजमेरा, सुरेखा वाणी, नयना वाणी, रितू पटवारी, श्वेता देशपांडे आदी उपस्थित होते. अ‍ॅड अमृता अजमेरा यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या