पणजी – Panaji वृत्तसंस्था
(goa result) नुकतंच समोर आलेल्या आकडेवारीनुसार 40 पैकी 18 जागांवर भाजप (bjp) आघाडीवर आहे. (Congress) काँग्रेस 10, अपक्ष 4, आप 2, एमजीपी 4, जीएफपी 1 तर आरजीपी 1 जागेवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. या आकडेवारीनुसार, गोव्यात भाजपची आघाडी दिसून येत आहे.
- Advertisement -
40 जागा असलेल्या गोव्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे; मात्र आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमजीपी आदी पक्षांनी यावेळी जोर लावल्यामुळे सर्वांचं लक्ष निकालाकडे आहे.
सध्याच्या आकडेवारीत भाजपला स्पष्ट बहुमत दिसत आहे. गोव्यात बहुमत न मिळाल्यास अपक्ष तसंच इतर पक्षांसोबत मिळून सरकार स्थापन करणारं असल्याचं भाजप आधीपासून सांगत आहे. मात्र, सध्या समोर आलेल्या आकडेवारीत भाजपाला स्पष्ट बहुमत दिसत असल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.