Tuesday, August 18, 2026
Homeक्राईमगोदावरी पट्ट्यात गोळीबाराचा थरार वाळूवरून शेतकर्‍यावर जीवघेणा हल्ला

गोदावरी पट्ट्यात गोळीबाराचा थरार वाळूवरून शेतकर्‍यावर जीवघेणा हल्ला

श्रीरामपूरच्या नगरसेवक अर्जून दाभाडेसह 9 जणांवर गुन्हा दाखल

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

वैजापूर तालुक्यातील बाभुळगावगंगा शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात वाळू व्यावसायिकांनी शनिवारी रात्री धुडगूस घालत गोळीबार केल्याने घबराट निर्माण झाली. या प्रकरणी जालिंदर सोपान कुंजीर यांनी तक्रार दिल्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथील 9 जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून एपीआय प्रदीप भिवसने हे तपास करीत आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालिंदर कुंजीर हे शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीपात्रात त्यांना माणसांचा घोळका दिसल्याने त्यांनी बॅटरीच्या उजेडात बघायचा प्रयत्न केला. त्यावेळी या वाळू व्यावसायिकांनी आमचे लोकेशन पोलीस व महसूल अधिकार्‍यांना देतो असे म्हणून अर्जुन दाभाडे, उद्देश मंडलीक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी ढेमके, राहुल चव्हाण, विजय उर्फ भोगर भास्कर हटांगळे, मंगेश साळवे, विजय पवार व राहुत थोरात यांनी कुंजीर यांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच यातील अर्जुन दाभाडे याने कुंजीर यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या बंदुकीतून दोन गोळ्या फायर केल्या. परंतु अंधारामुळे नेम हुकला. त्यांनतर जालिंदर व त्याच्या भावांनी जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला.

कुंजीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन खुशाल दाभाड, उद्देश अशोक मंडलीक, महेश गायकवाड (पूर्ण नाव माहित नाही), विकास उर्फ विकी बबन ढेमके, राहुल चव्हाण (पूर्ण नाव माहित नाही), विजय उर्फ भोगर भास्कर हटांगळे, मंगेश साहेबराव साळवे, विजय पवार (पूर्ण नाव माहित नाही), राहुत थोरात (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. गोंधवणी ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अर्जन दाभाडे हे श्रीरामपूर नगरपालिकेत आहेत. नगरसेवक आहेत. यापूर्वीही श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर कोकरे येथे वाळू तस्करांनी ग्रामस्थांवर दगडफेक केल्यानंतर तेथे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता ही घटना घडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संघर्ष होत असतानाही पोलिस आणि महसूलचे अधिकारी मूग गिळून आहेत, याबद्दल ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

संतप्त ग्रामस्थांकडून वाळूतस्करांना बेदम चोप
या घटनेची माहित कळताच संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी एकत्र येत श्रीरामपूरच्या काही वाळूतस्करांना पकडून बेदम चोप दिला. पुन्हा असे उद्योग केल्यास सोडणार नाही असा सज्जड दमही या गावकर्‍यांनी या वाळू तस्करांना दिला. ग्रामस्थांची आक्रमकता बघून इतर वाळूतस्करांनी धूम ठोकली.

ताज्या बातम्या

राज्यात २८ ऑगस्टपासून धर्मस्वातंत्र्य कायद्याची अंमलबजावणी; गृह विभागाकडून अधिसूचना जारी

0
मुंबई | प्रतिनिधीराज्यात सक्तीचे, फसवणुकीचे अथवा बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ ची अंमलबजावणी येत्या २८ ऑगस्टपासून होणार आहे. गृह विभागाने मंगळवारी यासंदर्भातील...