Monday, October 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्य सरकारी आणि इतर पात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के इतका झाला आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जानेवारी २०२६ पासून लागू होईल. वित्त विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

वाढीव महागाई भत्ता ऑगस्ट २०२६ पासून लागू आहे. तर जानेवारी २०२६ ते जुलै २०२६ या सात महिन्याच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम सुद्धा ऑगस्ट महिन्याच्या वेतनसोबत रोखीने दिली जाणार आहे. राज्यातील सुमारे ५ लाखाहून अधिक शासकीय कर्मचारी तसेच सुमारे ८ लाखापेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला मिळतोय हा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 375 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 3963 क्रेटस् ची...